खरे पाहता स्ट्रेचमार्कस् ही स्त्रीप्रमाणेच
पुरूषांमध्येही आढळून येणारी समस्या आहे. आपली त्वचा 80 टक्के कोलॅजीन आणि 4 टक्के इलॅस्टीन प्रोटीन्सनी बनलेली असते. कोलॅजीन त्वचेला नॉर्मल लूक देण्याचे काम करते. इलॅस्टीन प्रोटीन्स त्वचेला लवचिकता देतात.

- त्वचा तिच्या साधारण क्षमतेपेक्षा जास्त ताणली गेल्यास त्वचेला
- मधला थर फाटला जाऊन त्वचेतील कोलॅजीन आणि इलॅस्टीनचा नाश होतो आणि तिथे पातळ पापुद्रय़ासारखा व्रण तयार होतो. यालाच स्ट्रेचमार्कस् म्हणतात.
- स्ट्रेचमार्कस् अगदी छोटय़ा लाईन्सपासून मोठय़ा आकारापर्यंत असतात. सुरूवातीला लाल, गुलाबी आणि नंतर पांढर्या किंवा चॉकलेटी रंगाचे होतात. स्ट्रेचमार्कस् सर्वसाधारणपणे वयाच्या 12, 13 वर्षांपासून शरीरामध्ये होणार्या हार्मोन्सच्या
- बदलामुळे आणि असंतुलनामुळे होतात.
- प्रेग्नसीमध्ये पाचव्या, सातव्या महिन्यापासून अचानक वाढणार्या वजनामुळे किंवा मुलांमध्ये वेटलिफ्टिंग किंवा स्पोर्ट्मार्कस् जास्त प्रमाणात छाती आणि खांद्यावर आढळून येतात.
- लहान वयात आलेले स्ट्रेचमार्कस् वाढत्या वयाबरोबर कमी होतात. पण मोठय़ा वयात आलेले स्ट्रेचमार्कस् घालविणे अवघड असते. त्यासाठी त्वचारोग तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते.