गोल बागेसमोर नबाल मलिक यांच्या निषेधाच्या घोषणांनी दणाणला परिसर
प्रतिनिधी/ सातारा
नशेडी लोकांचा पर्दाफाश करणारे कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी समीर वानखेडे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. राष्ट्रकर्तव्य म्हणून ते चांगली सेवा करत आहेत. परंतु मंत्री नवाब मलिक हे अशा अधिकाऱयाचे खच्चीकरण करत आहेत. त्यांच्याच कारभाराची चौकशी करुन शरद पवारांनी त्यांना दुर ठेवावे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत साताऱयातील तरुणांनी समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ गोलबागेसमोर जोरदार निदर्शने केली. नवाब मलिक यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
साताऱयातल्या गोलबागेसमोर तरुणांनी हातात वुई सपोर्ट समीर वानखेडे, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मैदानात अशी घोषवाक्य हातात घेवून घोषणा देत होते. जोरदारपणे निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, प्रुझवर ड्रग्ज घेवून पार्टी चालली होती. त्या पार्टीमध्ये बरेच बॉलिवूडच्या कलाकारांची मुलं होती. त्या पार्टीत कर्तव्यनिष्ठ अशा शाहरुख खानच्या पुत्राला सहभागी झाल्याबद्दल अटक झाली होती. शाहरुख खानच्या मुलाला सोडविण्यासाठी आपल्या राज्याचा मंत्री दररोज कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर दररोज हल्ले करत आहेत. नवाब मलिक आणि ड्रग माफिया यांचा संबंध काय आहे का?, जर असेल तर शासनाने प्रशासनाने त्याचा शोध घेवून कारवाई करावी. समीर वानखेडे यांच्यावर वैयक्तिक हल्ले होत आहेत. ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही हिंदूत्ववादी उभे राहू. समीर वानखेडेंच्या रुपाने आम्हाला या महाराष्ट्रात दुसरा रवींद्र पाटील होवू द्यायचा नाही. अशा अधिकाऱयांला आम्ही बळी पडू देणार नाही. समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई ही अतिशय धाडसी कारवाई आहे. या कारवाईत अशा पद्धतीचा राजकीय दबाव येणार असे त्यांना माहिती असताना सुद्धा त्यांनी कारवाई केली. आज ड्रग्जमुळे या देशातील तरुणाई नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असे असताना आपल्या राज्याचे मंत्री या ड्रग्ज माफियांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. समीर वानखेडे हे शिक्षण घेवून क्लासवन अधिकारी होवून काम करत आहेत. त्या अधिकाऱयावर बारावी नापास मंत्री नोकरी घालवतो अशा वैयक्तिक धमक्या देतो आहे. हे कितपत योग्य आहे. अशा वेळी संविधान खतरे मे है असे म्हणणारे आणि उर बडवून घेणारे का मुग गिळून गप्प आहेत. का नवाब मलिकांना गुप्तपणे मदत करत आहेत. याचा शोध घ्यावा, संविधान खतरे मे है म्हणणाऱयांनी संविधानाचे रक्षण करणाऱया समीर वानखेडेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱयांच्या पाठीशी उभे राहवे. आमच राष्ट्रकर्तव्य आहे म्हणून येतो आहे. समीर वानखेडे यांची जात कोणती, धर्म कोणता याच्याशी नवाब मलिकांना का देणेघेणे आहे. त्यांचा जात आणि धर्माचा ड्रग्ज माफियाच्या कारवाईशी काय संबंध आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केले आहेत ते चुकीचे आहेत, असे प्रखर मत तरुणांनी मांडले. या आंदोलनात ओंकार डोंगरे, ऋषी कणसे, गणेश शिंदे, अक्षय शिंदे, हर्षल माळी, प्रवीण रसाळ, गुरुराज रसाळ, अजय बर्गे यांच्यासह हिंदू जनजागृती समिती, बजरंग दल, व्यसनमुक्ती युवक संघ, हिंदू योद्धा बोरखळ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.