- प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले पत्र
ऑनलाईन टीम / लखनऊ :
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात हल्ली घडलेल्या अपराधी घटना संदर्भात मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, सरकारने न्याय व्यवस्था सुधारावी कारण जनता त्रस्त आहे.

त्या पुढे म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील न्याय व्यवस्थेची स्थिती मोठ्या प्रमाणात बिघडत चालली आहे. अपराधी घटननासंदर्भात कडक कारवाई करण्याची गरज आहे. मंगळवारी प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले की, कानपूर, गोंडा आणि गोरखपूरच्या घटना आपल्याला माहिती असतील. मी गजियाबादमधिल एका परिवाराबाबत घडलेल्या घटनेबाबत आपले लक्ष वेधून घेऊ इच्छिते, माझे या परिवाराशी बोलणे झाले आहे.

गाझियाबाद मधील व्यावसायिक विक्रम त्यागी जवळपास एक महिन्यापासून हरवलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या मते त्यांचे अपहरण झाले असल्याची शंका आहे. वारंवार तक्रार देऊन सुद्धा पोलीस आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या प्रतिनिधीमंडळाने या परिवाराची भेट घेतली होती. त्यावेळी हे कुटुंब फारच तणावात होते.
प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी केली आहे की, विक्रम त्यागी यांच्या कुटुंबियांना मदत करावी. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करावी करा की पूर्णपणे त्यांची मदत करण्यात यावी.