ऑटोचालक संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे ऑटोरिक्षा व्यवसाय करणे कठीण बनले आहे. यातच आरटीओचे अधिकारीदेखील आम्हाला वेठीस धरत आहेत. एजंटराजमुळे आरटीओमधील विविध कामासाठी अधिक रक्कम भरावी लागत आहे. तेव्हा नियमानुसार जी रक्कम आहे ती घेऊन आमची सर्व कामे करावीत, अशी मागणी उत्तर कर्नाटक ऑटो चालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
रिक्षा घेण्यासाठी आम्हाला कर्ज घ्यावे लागते. मात्र 15 वर्षांनंतर ती रिक्षा स्क्रॅपमध्ये घाला असे सांगण्यात येत आहे. मात्र, 15 वर्षात कर्ज भरणे अशक्मय आहे. आरटीओ खर्च, पेट्रोल व इतर खर्चामुळे रिक्षा व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे. रिक्षा परवाना घेण्यासाठी तसेच रिक्षा चालविण्याचा परवाना घेण्यासाठी नियमापेक्षा अधिक रक्कम आमच्याकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला फटका बसत आहे. तेव्हा जो सरकारी नियम आहे त्यानुसारच आमच्याकडून रक्कम घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जिल्हाधिकाऱयांबरोबरच आरटीओ अधिकाऱयांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर कर्नाटक ऑटो चालक संघटनेचे अध्यक्ष शंकरय्या मठपती, उपाध्यक्ष बसवराज अवरोळी, सेपेटरी जीवन उत्कटी, बाबाजान बळकानूर, निपाणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, मोहम्मद लिंगरे यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते..