शिक्षण अन् संरक्षण मंत्रालयाची योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तरुण-तरुणींमध्ये सैन्य आणि अन्य सुरक्षा दलांबद्दलची जागरुकता वाढविण्यासाठी केंद्र सरकार आता सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनिवार्य एनसीसी (नॅशनल कॅडेट कोर) प्रशिक्षणाशी जोडण्याच्या तयारीत आहे. या दिशेने काम सुरू झाले आहे. सध्या याची सुरुवात केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयांमधून होणार आहे.
आदिवासीबहुल क्षेत्रांना प्राथमिकतेने सामील करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे. शाळांमध्ये एनसीसी विंगच्या विस्ताराची ही योजना नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारसीनंतर तयार करण्यात आली आहे. यात संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने राज्य सरकारांना यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे म्हटले गेले आहे. एनसीसी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची ओळख पटविण्यास मदत मिळेल तेच सैन्य आणि सुरक्षा दलांसोबत मिळून स्वतःची कारकीर्दी घडविण्याची संधी त्यांना प्राप्त होणर आहे.
शिक्षण मंत्रालयाने या योजनेवर वेगाने काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातील सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण सुरू केले जाईल. याचबरोबर राज्यांनाही याची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.