बेंगळूर
देशातील सर्वात मोठा फॅशन सेल सादर करण्याची तयारी मिंत्रा यांच्याकडून चालली असल्याचे समजते. 5 दिवस चालणाऱया या फॅशन सेलमार्फत कंपनीला 40 लाख ग्राहकांपर्यंत पोहचायचे आहे, असे सांगण्यात आले. वॉलमार्ट या मोठय़ा रिटेल क्षेत्रातील कंपनीची सहकारी ऑनलाइन प्लॅटफॉर्म रिटेल फर्म म्हणून मिंत्रा कार्य करते आहे. कोरोना महामारीमुळे ऑनलाइन खरेदीला अच्छे दिन आले असल्याने ही संधी काबीज करण्यासाठी मिंत्राने पूर्ण तयारी केली आहे. एंड ऑफ सीझन सेल येत्या रविवारी सुरू होणार असल्याचे समजते. मिनीटाला 20 हजारपेक्षा जास्त लोकांची ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी कंपनीची आहे.