वयाच्या 105 व्या वषी साक्षरतेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भागिरथी अम्मा यांचे त्यानंतर अवघ्या दोन वर्षात म्हणजेच 22 जुलै 2021 ला निधन झाले आहे. त्यांनी इतक्मया मोठय़ा वयात साक्षरता परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. गेल्या दोन वर्षात त्यांना विविध आजारांनी ग्रासले होते. मूळची प्रकृती कणखर असली तरी वृद्धापकाळामुळे निर्माण झालेले आजार त्यांना सतावत होते. तशाही परिस्थितीत त्यांनी अभ्यास करून साक्षरता परीक्षा यशस्वी करून दाखविली. ज्या वयात कुणालाही पैलतीर दिसू लागेल, त्या वयात त्यांनी साक्षरतेचे महत्त्व ओळखून आपली निरक्षरतेची त्रुटी प्रयत्नपूर्वक दूर केली. या साक्षरतेचा त्यांना फारसा उपयोग झाला नसला तरी साक्षरता प्रसारासाठी त्यांचे हे उदाहरण अत्यंत प्रेरणादायक ठरले आहे. भागिरथी अम्मा या चौथी इयत्ता उत्तीर्ण होणाऱया सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी ठरल्या होत्या. चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नंतर लॉकडाऊनच्या काळातही पुढचा अभ्यास सुरू ठेवला होता. तसेच वाचनाची आवडही जोपासली होती. अगदी बालपणीच आई गेल्यामुळे त्यांना शिकता आले नव्हते. ही खंत त्यांना सतत सतावत होती. त्यामुळे त्यांनी वयाच्या शंभराव्या वषी शिकण्यास प्रारंभ केला. तोपर्यंत संसारिक कार्यव्यापामुळे त्या शिकू शकल्या नव्हत्या. त्यांचा निर्धार आणि जिद्द खरोखरच अनुकरणीय आहे.
Trending
- Sangli Breaking : तासगावात चाकूने पाच वार करून तरुणाचा खून.
- 350 व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
- माणसातला देवमाणूस ! डॉ . ज्ञानेश्वर दुर्भाटकर
- Ratnagiri Breaking : जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात तिघांना जन्मठेप
- सिमेंट- मिक्सर ट्रकची कारला धडक ७ जखमी; जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश
- कोल्हापूरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
- गोल्याळी फाट्यानजीक बस -दुचाकीची धडक; चार जण गंभीर जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ रोजी हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्गात !