ऑनलाईन टीम / तरुण भारत
गोवा राज्यातील पणजी वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सलीम शेख तसेच फातोर्डा पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल सुधीर तळेकर यांना प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस पदके जाहीर झाली आहेत. तर अरुणाचल प्रदेशमध्ये सेवेत असलेले गोमंतकीय आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांना ही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली आहे.
प्रजासत्ताक दिन-2022 निमित्त एकूण 939 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत.या निमीत्ताने महाराष्ट्रातील पोलीसांना एकूण 51 पदके प्रदान करण्यात येणार असल्याने याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
189 शौर्य पुरस्कारांपैकी, सर्वाधिक 134 पुरस्कार जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील शौर्य कामगिरीबद्दल तिथल्या पोलिसांना पुरस्कृत करण्यात आले.अतिरेकी डाव्या विचारसरणीने प्रभावित भागातील 47 पोलीस आणि ईशान्य प्रदेशात 01 पोलिसांस त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कृत केले आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये 115 जवान जम्मू-काश्मीर पोलिस, 30 सीआरपीएफ, 03 आयटीबीपी, 02 बीएसएफ, 03 एसएसबी, 10 छत्तीसगड पोलिस, 09 ओडिशा पोलिस आणि 07 महाराष्ट्र पोलिस आणि उर्वरित राज्य तसेच केन्द्र शासित प्रदेशातील आहेत.
पोलिस शौर्य पदक विजेत्यांमधे महाराष्ट्रातील पुढील पोलिसांचा समावेश आहे.
गोपाल मणिराम उसेंडी, एपीएस आयपीएमजी. महेंद्र गानू कुलेती, एनपीसी पीएमजी. संजय गणपती बकमवार, पीसी पीएमजी. भरत चिंतामण नागरे, पीएसआय पीएमजी. दिवाकर केसरी नरोटे, एनपीसी पीएमजी. निलेश्वर देवाजी पाडा, एनपीसी पीएमजी. संतोष विजय पोटावी, पीसी पीएमजी.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्यांमधे महाराष्ट्रातील पुढील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे :
विनय महादेवराव करगावकर, अतिरिक्त पोलिसमहासंचालक, मुंबई. प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट, एस.आर.पी.एफ.जीआर.व्हीआय, धुळे. चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक, पी.टी.सी. दौंड, पुणे. अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक. नांदेड अशी या पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नावे आहेत.