प्रतिनिधी / इस्लामपूर
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची भेट घेवून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांनी पक्ष वाढ व अन्य बाबीवर चर्चा केली. दरम्यान राहुल व सम्राट महाडिक हे पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असल्याचे गौरवोद्गार काढले.
सोमवारी आ. शेलार सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष व आ. आशिष शेलार यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणी सदस्य सम्राट महाडीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री आ. सुरेश खाडे , भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष राहुल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सांगली जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. यावेळी प्रवीण चिकुर्डेकर,रितेश अग्रवाल यांच्या सह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.