वार्ताहर / शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे पाच कोरोना रुग्ण सापडल्याने, प्रशासनाच्या वतीने बाधित झालेला भाग बंद करून कोकरूड बाजारपेठ सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
येथे पहिल्यांदा ५४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्याच्या संपर्कात आलेल्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा ही कोरोना अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिरिस्क असलेल्या ११ जणांना शिराळा येथील संस्थात्मक विलीनीकरण कक्षात पाठवण्यात आले होते. तर सध्या १८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील आज त्यातील 65 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला व 21 वर्षीय मुलगी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना मिरज येथील कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाढती रुग्ण संख्या पाहता कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून, आरोग्य विभागाने संपूर्ण गावात उपाय योजना सुरू केल्या आहेत. ग्रामपंचायत मार्फत गावात औषधांच्या फवारणी करण्यात येत आहे. येथे तहसिलदार, गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, प्राथमिक आरोग्य अधिकारी यांच्यासह सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक यांनी गावास उपाय योजना सुरू केल्या आहेत.
Previous Articleबेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 156 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Related Posts
Add A Comment