प्रतिनिधी / सांगली
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला नियमित ऑक्सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. यामुळे कोरोना महामारीच्या संकटात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. कनार्टकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून हा ऑक्सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासाठी सहकार्य केले.
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन गरज आहे पण ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. ही.कंपनी नियमित एक टँकर देणार आहे.
Previous Articleपोटनिवडणूक निकाल: २ मे रोजी विजयी मिरवणुकीवर बंदी : निवडणूक आयोग
Next Article तृणमूल-भाजपच्या लढाईत डाव्यांची भूमिका महत्त्वाची
Related Posts
Add A Comment