प्रतिनिधी / आटपाडी
राजकीय द्वेषापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासमोर उपस्थित असतानाही जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात माझ्या नावाचा समावेश केला. असे असले तरी गोरगरीबांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करतच राहणार आहे. अशी कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, असा इशारा आटपाडीचे युवा नेते अनिल पाटील यांनी दिला
निंबवडे येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परस्पर विरोधी ही 29 जणांवर विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये खासदार संजयकाका पाटील समर्थक अनिल पाटील यांचाही समावेश आहे.
सदरच्या खोट्या गुन्हा विरोधात अनिल पाटील समर्थकांनी रविवारी आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याची तयारी केली. परंतु आबानगर चौकात सर्व तरुणांना अनिल पाटील यांनी मोर्चा न काढण्याचे आव्हान केले. खासदार संजयकाका पाटील यांनी याप्रकरणी पोलिस अधिकार्यांशी चर्चा केली असून कोरोनाच्या संकट कालावधीत मोर्चा काढून प्रशासनाला त्रास न देण्याची भूमिका अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
गोरगरिबांना मदत करत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी झटत राहणार आहे. लोकांची कामे करत असताना त्यांना न्याय मिळवून देणे इतकीच माझी भूमिका आहे. परंतु राजकीय द्वेषापोटी माझ्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेवेळी मी स्वतः पोलीस अधिकाऱ्यासमोर उपस्थित असताना माझे नाव जाणीवपूर्वक गोवण्यात आले . अशा दबावाला मी बळी पडणार नाही. असे अनेक खोटे गुन्हे माझ्यावर दाखल झाले तरी अन्यायाविरोधात कोणाशीही संघर्षाची माझी तयारी आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत सर्वसामान्यांच्या मदतीचा हा सिलसिला अखंडित ठेवेन, आसा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
पोलिस प्रशासनाला सहकार्याची आमची नेहमीच भूमिका आहे परंतु कोणाच्यातरी दबावाला बळी पडून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार थांबला पाहिजे, असे आवाहनही अनिल पाटील यांनी केले याप्रसंगी युवा उद्योजक विनायक मासाळ, बंडू कातुरे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
Previous Articleमोदींनी दिले 2 कोटी रोजगाराचे आश्वासन अन् झाले 14 कोटी बेरोजगार
Related Posts
Add A Comment