वार्ताहर / शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील गवळेवाडी येथील 55 व 32 वर्षीय महिला तर 42 व 60 वर्षीय पुरुष आणि 1 वर्षाचा मुलगा या 5 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून येथील रुग्ण संख्या 12 झाल्याने हे गाव हॉटपॉट झाले आहे. अजूनही रुग्ण संख्या वाढणार असल्याच्या शक्यतेने ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने संपूर्ण गावात औषध फवारणी केली.
या अगोदर येथील 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असून 6 लोक पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्यावर मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काल येथील 55 व 32 वर्षीय महिला तर 42 व 60 वर्षीय पुरुष आणी 1 वर्षाचा मुलगा या 5 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना मिरज येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील रुग्ण संख्या 12 झाली असून त्यांच्या संपर्कातील 8 लोकांना शिराळा येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.
येथील कोरोना साखळी तोडण्यासाठी तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, वैधकीय अधिकारी वासिम जमादार , ग्रामसेविका मुलाणी, डॉ. रेणके, ( सी. एच. ओ.)आरोग्य सहाय्यक एन. एम. मुल्ला, आरोग्य सेवक पी. यु.शिंदे,आरोग्यसेविका महाडीक, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उपाय योजना सुरु केल्या आहेत.तर आरोग्य विभागाच्या वतीने संपर्कातील लोकांची यादी काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
Previous Articleगलवान खोऱ्यात हल्ल्याची योजना आखणाऱ्या चिनी अधिकाऱ्याची बदली
Next Article कर्नाटकः १०० वर्षाच्या वृद्ध महिलेची कोरोनावर मात
Related Posts
Add A Comment