संख / वार्ताहर
जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील मुंजेवस्ती येथे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधीक्षक मनीषा डुबले व उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली गुन्हे अन्वेषण यांच्या छाप्यात दोन लाख ५७ हजार गांजा जप्त करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, पांढरेवाडी पासून दोन किलोमीटर अंतरावर मुंजे वस्ती आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली यांना खास खबऱ्या यामार्फत अंबादास शेषापा तांबे यांच्या ऊसाच्या शेतात गांजा लागवड केल्याची माहिती मिळाले. त्यानुसार छापा टाकला असता उसाच्या शेतात गांजा एकुण २५ किलो ७०० ग्रॅम आढळून आले. त्याचे बाजारभावाप्रमाणे पंचनामा केले असता दोन लाख ५७ हजार इतकी झाली. सांगली गुन्हे अन्वेषण यांनी उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष अंबादास तांबे यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्जेराव गायकवाड, सा. पो. निरीक्षक प्रशांत निशांनदार, उमदी पोलीस ठाण्याचे सा. पो. निरीक्षक पंकज पवार, संदीप पाटील, संदीप नलवडे,आमसिद्ध खोत, इंद्रजीत गोदे, भगवान कोळी, यांनी कारवाई केली.