प्रतिनिधी/जत
सबंध राज्यभर कोरोनो व्हायरस धुमाकूळ घालत आसताना जत तालुका मात्र सुरक्षित होता, पण अखेर आज, शुक्रवारी तालुक्यातील अंकले येथील 55 वर्षीय एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने अंकले गाव व परिसर कंटेंटमेन्ट झोन म्हणून घोषित केला आहे तर तालुक्यात दक्षता घेण्यात आली आहे.
मुंबई येथे वास्तव्यास असलेले तालुक्यातील अंकले येथील चौघेजण कामाला होते. चौघेजण बुधवारी चेंम्बूर मधून माल वाहतूक ट्रकमधून नागजफाटा येथे आल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबई येथून अंकलेपर्यत बुधवारी पहाटे चालत आले होते. तेथील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अंकले जिल्हा परिषद शाळेत त्यांना क्वारंटाईन केले होते.
दरम्यान, नागज येथून माहिती मिळाल्यानंतर डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याची तपासणी केली होती. त्यात एकाची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्याला मिरजला हलविले होते. तेथे त्यांच्या स्वाबची तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत.
तालुक्यात आतापर्यत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परिस्थिती नियत्रंणात ठेवण्यांत यश आलेल्या यंत्रणेला यामुळे मोठा धक्का बसला आहे. तसेच या चौघा जणांनी चेंम्बूरहून वाशी पर्यत ट्रँक्सीने वाशी ते फलटण मालवाहतूक ट्रक व फलटण ते नागजपर्यत मालवाहतूक ट्रकने नागजपर्यत आले होते. तेथून चालत ते अंकले येथे आले होते. दरम्यान ट्रक्सी चालक,मालवाहतूक ट्रक चालकांचे शोध सुरू आहेत.त्याशिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कातील तिघाजणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांची तपासणी केली जात आहे.
तालुक्यात शुकशुकाट
जत तालुक्यात कोरोनो रुग्ण सापडताच मोठी खळबळ उडाली आहे, आपण सुरक्षित असल्याची भावना बाळगून विनाकारण रस्त्यावर फिरणारे लोकानी लगेच घरीच राहणे पसंत केले आहे, आहे, शिवाय तालुका प्रशासनाने कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे, जत शहरात ही मोठी दक्षता घेण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर जत शहरासह तालुक्यात शुकशुकाट निर्माण झाला आहे
Previous Articleश्रमिकांच्या बलिदानाचे राज्य ते हेच का?
Next Article साठवणीतली आठवण
Related Posts
Add A Comment