प्रतिनिधी/सांगली
जिल्हÎात दोन महिन्यानंतर प्रथमच पॉझिटिव्हिटीचा रेट हा साडेसात टक्क्यांवर आला आहे. ही जिल्हÎासाठी आनंदवार्ता आहे. जिल्हÎात रविवारी नवे 812 रूग्ण आढळून आले आहेत. तर 878 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असणाऱया 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारात आठ हजार 951 रूग्ण आहेत. जिल्हÎात वाळवा तालुक्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे, याठिकाणी रविवारी 188 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
मनपाक्षेत्रात 118 रूग्ण
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या चांगलीच आता आटोक्यात येत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 118 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात रूग्णसंख्या कमी झाली होती. त्यामध्ये रविवारी थोडीशी वाढ झाली आहे. सांगली शहरात 94 तर मिरज शहरात 24 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 29 हजार 520 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 89 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
वाळवा तालुक्यातील रूग्णसंख्या आटोक्यात नाही
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक कमी झाला आहे. पण, वाळवा तालुक्यात मात्र रूग्णसंख्या अद्यापही कमी होताना दिसून येत नाही वाळवा तालुक्यात रविवारी 188 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हÎाचा पॉझिटिव्हिटीचा दर चढता आहे. जिल्हÎातील इतर सर्व तालुक्यात आता फक्त दुहेरी रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे हा जिल्हÎाला फार मोठा दिलासा आहे. आटपाडी तालुक्यात अवघे 30 रूग्ण वाढले आहेत. तर कडेगाव तालुक्यात 55 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 30 तर पलूस तालुक्यात 84 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 20 तर जत तालुक्यात 50 रूग्ण वाढले. कवठेमहांकाळ तालुक्यात 42, मिरज तालुक्यात 110 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात 85 रूग्ण वाढले आहेत. तर वाळवा तालुक्यात 188 रूग्ण वाढले आहे.
20 जणांचा मृत्यू
जिल्हÎात 20 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरात दोन मिरज शहरातील एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात तीन तर कडेगाव तालुक्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात एकाचा तर तासगाव तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात एकाचा, मिरज तालुक्यातग्न पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
878 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्हÎात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 878 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हÎात एक लाख 30 हजार 201 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील एक लाख 17 हजार 512 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हÎाला दिलासा मिळाला आहे.
नवे रूग्ण 812
उपचारात 8951
बरे झालेले 111715
एकूण 130201
मृत्यू 3738
रविवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 30
कडेगाव 55
खानापूर 30
पलूस 84
तासगाव 20
जत 50
कवठेमहांकाळ 42
मिरज 110
शिराळा 85
वाळवा 188
सांगली शहर 94
मिरज शहर 24
एकूण 812
लसीकरण
आजचे 305
एकूण 741166
कोरोना चाचणी – 10526