महापालिका क्षेत्रात 27 रूग्ण वाढलेः ग्रामीण भागात 158 वाढलेः दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात नवीन 185 रूग्ण वाढले, तर 255 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात 44 हजार 755 रूग्ण झाले आहेत. तर 41 हजार 247 रूग्ण बरे झाले आहेत. आज अखेर एक हजार 628 रूग्णांचा बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 27 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात बुधवारी 27 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 15 तर मिरज शहरात 12 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात रूग्ण संख्या आता आटोक्यात येवू लागली आहे. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळत चालला आहे. महापालिका क्षेत्रात 15 हजार 982 रूग्ण झाले आहेत. त्यातील 92 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 158 रूग्ण वाढले
ग्रामीण भागातही रूग्ण संख्या आटोक्यात येवू लागली आहे. बुधवारी ग्रामीण भागात 158 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 16, जत तालुक्यात 17 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 27, कवठेमहांकाळ तालुक्यात 11, खानापूर तालुक्यात 13 तर मिरज तालुक्यात सात रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्या 10, शिराळा तालुक्यात नऊ, तासगाव तालुक्यात 30 तर वाळवा तालुक्यात 18 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात 158 रूग्ण वाढले आहेत.
उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कुपवाड शहरात एकाचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्हयात एक हजार 628 जणांचा बळी गेला आहे.
तीन हजार 436 जणांचा स्वॅब तपासला
जिल्हयात बुधवारी तीन हजार 436 जणांचा स्वॅब तपासण्यात आले आहेत. आरटीपीसी मध्ये एक हजार 130 स्वॅब तपासण्यात आले आहेत. तर रॅपीड ऍण्टीजणमध्ये दोन हजार 306 जणांचे स्बॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये 185 रूग्ण आढळून आले आहेत.
255 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्हयात बुधवारी 255 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 41 हजार 247 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट आता 91 टक्के झाला आहे. जिल्ह्यात सध्या उपचारात एक हजार 880 रूग्ण आहेत.
परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर जिल्ह्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी नवीन एक रूग्ण वाढला. कोल्हापूर जिल्ह्यातील एक रूग्ण वाढला आहे. आजअखेर एक हजार 383 रूग्ण झाले आहेत. त्यामध्ये एक हजार 140 रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारात 37 रूग्ण आहेत. बुधवारी दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर 206 रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
नवीन रूग्ण 185
उपचारात 1880
बरे झालेले 41247
एकूण 44755
बळी 1628