सोमवारी जिह्यात कोरोनाचे नवीन १० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ३६८ झाली आहे. तर सोमवारी एकही रूग्ण कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या १३० वर गेली आहे. उपचारातील तीन रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बिळूर कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट
जत तालुक्यातील बिळूर येथे कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाला आहे. सोमवारी या एकाच गावात सहा व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये ३० वर्षीय व्यक्ती, ५५ वर्षीय महिला, ३० वर्षीय व्यक्ती, ३१ वर्षीय व्यक्ती, ४२ वर्षीय आणि ४४ वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे. बिळूर येथे गेल्या चार दिवसांपासून दररोज कोरोना रूग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे या गावात आरोग्य यंत्रणेकडून मोठय़ा प्रमाणात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शिराळा, शिंदेवाडी आणि सांगली येथे रूग्ण वाढले
कोरोनाचा शिराळा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. पण, आता त्याने शिराळा शहरात शिरकाव केला आहे. शहरातील दोन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये ४२ वर्षीय महिला आणि सात वर्षांचा बालक यांचा समावेश आहे. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील २१ वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयातील त्या दोन ब्रदरच्या संपर्कातील २९ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही व्यक्ती सांगली शहरातील सम्राट व्यायाम मंडळाजवळ राहते. या एकाच ठिकाणचे तीन रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
अतिदक्षता विभागात तीनजणांवर उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील ६९ वर्षीय व्यक्ती, जत तालुक्यातील बिळूर येथील ७५ वर्षीय व्यक्ती, तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील २२ वर्षीय महिला या तीनजणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिह्यातील स्थिती
एकूण रूग्ण ३६८
बरे झालेले २२६
उपचारात १३०
मयत १२