पंचायत समितीच्या सभेत ठराव
प्रतिनिधी / मिरज
शासनाने शहरातील अपेक्स रुग्णालयाचे संचालक डॉ. महेश जाधव यांची सर्व मालमत्ता जप्त करुन विक्रीतून येणारी रक्कम रुग्णालयात मयत झालेल्या 87 लोकांच्या नातेवाईकांना द्यावी, असा ठराव शुक्रवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत झाला.
रुग्णालयाला परवानगी देणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करत पंचायत समिती सदस्य अजयसिंह चव्हाण यांच्या मृत्यूलाही डॉ. जाधव हेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. डॉ. जाधव यांच्यासह रुग्णालय सुरू करण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णयही सभापतींसह सर्वच सदस्यांनी घेतला.