पोलीस निरीक्षक, महावितरण अधिकारी यांनाही लागण
प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तालुक्याचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांच्यासह पोलीस ठाण्याचे निरीक्षक, महावितरणचे उपअभियंता यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्यातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच असुन आत्ता नेते आणि अधिनान्यांना बाधा झाल्याने चितेत वाढ झाली आहे.
आटपाडी तालुक्यातील कोरोनाबाधिताच्या संख्येने सहाशेचा आकडा गाठला आहे. आटपाडी, दिघनी, यपावाडी ही गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. ही संख्या कमी होण्याऐवजी लागण विस्तारत आहे. शनिवारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना उपचारासाठी कराडला हलविण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी सोशल मिडीयावरून घाबरून न जाता संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य एका युवा नेत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक देखील कोरोनाबाधित झाले. आटपाडी महावितरणने अधिकारी यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आटपाडी शहरात दिवसभरात तीन महत्वाच्या व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील अन्य लोकांनी माहिती घेण्याबाबत आरोग्य विभागाच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.
कोरोनाचा फैलाव वाढत असताना अद्यापही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क-सॅनिटायझरचा वापर न करणे असे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव येत आहे. वाढती रूग्णसंख्या कमी करण्यासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या आटपाडीमध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळावा. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकासह व्यापारी वर्गातून होत आहे. आटपाडी ग्रामपंचायतने याबाबत कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त आहे.
Trending
- पाकला नमवत भारतीय युवकांनी जिंकला आशिया चषक
- एलिस मर्टेन्स, आर्यना साबालेन्का चौथ्या फेरीत
- रेल्वे अपघातात 50 ठार
- कायद्याला वाकुल्या दाखविणाऱ्या विधानसभा
- तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत उदासीनता का ?
- ‘रिझनेबल टाइम’मध्ये शिंदे सरकार गतिमान!
- लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये
- भारतीय वंशाचा देव शाह स्पेलिंग बी चॅम्पियन