मिरज-मालगांव रस्त्यावर थरार, दोघे जखमी, कोयता, लोखंडी रॉडचा वापर
प्रतिनिधी / मिरज
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्यानंतर पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन झालेल्या वादावादीमुळे दोन गटात तुंबळ मारामारी झाली. एका शिक्षकाच्या डोक्यात धारदार कोत्याने वार करण्यात आले. तर दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जखमी केले. मिरज-मालगांव रस्त्यावर इंदिरानगर फाट्यापासून दिंडीवेस चौकापर्यंत मारामारीचा हा थरार सुरू होता.
याबाबत हेमंत चंद्रकांत माने (वय 19, रा. श्रीनिवास हॉस्पिटलजवळ, माधवपेठ, वडर गल्ली, मिरज) आणि हिम्मत नामदेव शिंदे (वय 20, रा. मंगसूळी रोड, शिंदेवस्ती, बेडग) या दोघांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाकडील 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.