म्हैसाळ/वार्ताहर
सुरवातीपासून सलग ५ महिने कोरोनामुक्त असलेला म्हैसाळ परीसर गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना बाधित हॉटस्पॉट बनला आहे. शुन्यावर असलेल्या म्हैसाळ केंद्रातर्गत भागात पाचशेहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह संख्या झाली असल्याची माहिती म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी नंदकुमार खंदारे यांनी दिली.
म्हैसाळ केंद्रांतर्गत म्हैसाळ, विजयनगर, नरवाड,वड्डि,ढवळी, इनामधामणी (जुनी,नवी), बामणी आणि अंकली या गांवाचा समावेश आहे.
या केंद्रांतर्गत असणार्या म्हैसाळ-११५, विजयनगर – ४८,ढवळी-२९,वड्डी-१९, नरवाड-१९,इनामधामणी बामणी -१२१, अंकली-१२६ अशी कोरोणा बाधितांची संख्या आहे. उपचारात होमक्वारंटाईन मध्ये ६५, कोवीड उपचार केंद्रात ६७ तर इतर खासगी हॉस्पिटल्स मध्ये १३ रूग्ण उपचार घेत असून आज अखेर २३ जण मृत्यू झाल्याचे डॉ.खंदारे यांनी सांगितले.
कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्रांतर्गत भागात सतत रॅपिड टेस्ट घेतल्या जात असून सुमारे २५००हून अधिक व्यक्तींची तपासणी केली आहे. यासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गासह ४०आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. दरम्यान या केंद्रास दोन वैद्यकीय अधिकारी मंजूर असून सध्या कोरोनाच्या महामारीत एकाच अधिकार्यावर कामाचा बोजा पडला आहे.अशा काळात तातडीने दुसरे वैद्यकीय अधिकारी द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थानी सोशल डिन्सनसिंग पाळवे, सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, गर्दी टाळवी असे आवाहन केले जात आहे.
Trending
- वारकऱ्यांसाठी देहूतील आरोग्य यंत्रणा सज्ज, पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू
- आषाढी वारीसाठी कसबा बीड पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाच्या पायी दिंडींचे प्रस्थान
- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या देहुतून प्रस्थान
- चांदोली धरणात एका महीन्यापुरतं पाणी… मोरणा धरणानेही तळ गाठला
- Ratnagiri Crime News : स्कीममध्ये पैसे गुंतवल्याने तरूणाला 11 लाखांचा गंडा
- Ratnagiri News : मिऱ्या येथे ‘योमन मरीन’ची बंद गेट बळजबरीने उघडली
- सहायक उद्यान निरीक्षकास 17 हजारांची लाच घेताना एसीबीकडून अटक
- कपिलेश्वर कॉलनीतील घरांमध्ये शिरले ड्रेनेजचे पाणी