प्राध्यापक शरद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, ३० एप्रिल पर्यंत दिली मुदतवाढ
प्रतिनिधी / मिरज
सांगली-मिरज रस्त्यावरील चंदनवाडी इंदिरानगर येथे मध्य रेल्वेच्या जागेवरील असलेली अतिक्रमणे हटविण्यास मध्य रेल्वे विभागाने मुदतवाढ दिली आहे. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी रेल्वे विभागीय सहाय्यक अभियंत्यांकडे यासाठी पाठपुरावा केला होता. आता ३० एप्रिल पर्यंत अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
येथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आणि कुष्ठरोग्यांच्या भावना समजून घेतल्याशिवाय कारवाई करू नये, अशी मागणी प्रा. शरद पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने सदरचे अतिक्रमणे हटविण्यास ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तोपर्यंत नागरिक आणि इतरत्र स्थलांतरित व्हावे अशा सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, येथील कुष्ठरोग्यांची वसाहत स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रा. शरद पाटील यांनी सांगितले.