प्रतिनिधी / शाहुवाडी
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्ट्रक्शन बरोबर मास्क वापरणे बंधनकारक आहे मात्र याच उल्लंघन करणाऱ्या विक्रते यांच्यासह शहरात मास्कचा वापर न करता फिरत असलेल्या नागरिक यांच्यावरही शाहूवाडी पोलीस यांच्यासह मलकापूर नगर परिषदेच्यावतीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसात दहा हजार रुपयांचा दंड केला.
मलकापूर शहरासह शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचा विळखा अधिकच वाढू लागला आहे नागरिक आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी प्रशासनाने ही आता कडक् भूमिका घेतली आहे शहरातील विक्रते यांसह शहरात येणाऱ्या नागरिकांनीही मास्क वापरण गरजेचं आहे मात्र या गोष्टीचं उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच पोलिस प्रशासनाच्या साथीने मलकापूर नगर परिषदेने शहरात विशेष मोहिम राबवली या मोहिमेत मास्कचा वापर करत नसलेले नागरिक यांच्यासह शहरातील विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
या मोहिमेत मुख्याधिकारी शीला पाटील यांच्यासह पालिकेचे अधिकारी ए के पाटील, प्रसाद हर्डीकर, महेश गावखंडकर, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व मलकापूर नगर परिषदेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला.