प्रतिनिधी / सांगली
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या लॉकडाउनला गुरुवारी सांगलीमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. आठ दिवस सुरू राहणाऱ्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. बंदमुळे सांगली शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद आहेत.
यात दत्त मारुती रोड, कापड पेठ, हरभट रोड, गणपती पेठ, स्टेशन रोड, कॉलेज कॉर्नर, वखार बाग, राजवाडा चौक, परिसर एसटी स्टँड, सिविल रोड, गाव भाग. खनभाग टिंबर. एरिया विश्रामबाग अशा सर्व प्रमुख ठिकाणचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. शासकीय निमशासकीय कार्यालय बँका पतसंस्था सुरू असल्या तरी येथे गर्दी दिसत नव्हती एसटीसह सर्व प्रकारची वाहतूक रिक्षा पूर्णपणे बंद होत्या पोलिसांकडून ठिक – ठिकाणी नाकाबंदी करून विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना पकडण्याची कारवाई सुरू केली आहे. पेट्रोल पंप सुरू असले तरी येथे अत्यावश्यक वगळता अन्य कोणालाही इंधन देण्यात येत नव्हते, भाजी मंडई मध्येही शुकशुकाट जाणवत होता.
Previous Articleभारतीय ‘मिशन मंगळ’नंतर चीनचे ‘रोवर मिशन टू मार्स’ लॉन्च
Next Article सैनिक टाकळी परिसरात कोरोनामुळे दोन मृत्यू
Related Posts
Add A Comment