सांगे: सांगे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत जात असली, तरी अन्य तालुक्यांच्या तुलनेत स्थिती चांगली आहे. मात्र जनतेने खबरदारी घेण्याची गरज आहे. सोमवारी सांगे तालुक्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १३१ इतकी होती. आतापर्यंत ६ जण दगावल्याचे वृत्त आहे. तर ठीक झालेल्यांचा आकडा २६० च्या आसपास आहे.
गणेश चतुर्क्षीपूर्वी रुग्णांचा आकडा कमी होता. मात्र गेल्या काहि दिवसांपासून संख्या वाढू लागली आहे. वास्तविक सांगेतील प्रशासनाने सुरुवातीपासून उत्तम प्रकारे यंत्रणा हाताळलेली आहे. उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, संयुक्त मामलेदार अॅना रिटा पायस, पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर, आरोग्यधिकारी सीमा पै फोंडेकर यांनी या महामारीविरुद्ध चांगले कार्य केले आहे. त्याचबरोबर सांगेचे आमदार प्रसाद गावकर, नगराध्यक्ष कॅरोज क्रूझ व माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रूमाल्ड फर्नांडीस, अन्य नगरसेवक, सरपंच, पंच यांनी देखील प्रशासनाला उत्तम प्रकारे साहाय्य केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत जनतेला मदत करण्यात ते पुढे होते. माजी आमदार सुभाष फळदेसाई हे देखील आपली भूमिका पार पडताना दिसून आले होते.
यावर्षी कोरोनामुळे साळावली धरण, बॉटनिकल गार्डन व धबधब्यावर प्रवेशबंदी असल्याने पर्यटक येऊ शकले नाहित. याचाहि फायदा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने झाला आहे. वनखाते व जलस्रोत खात्याने काटेकोरपणे याचे पालन केले. त्याचप्रमाणे एप्रिल, मे महिन्यात कुर्डी व माडेल, साळावली येथे मौजमजा करण्यासाठी येणार्यांना रोखण्याच्या बाबतीत स्थानिक प्रशासन व पोलिसांनी उत्तम कार्य केले. मधल्या काळात पोलीस निरीक्षक पन्हाळकर हे आजारपणामुळे रजेवर गेले असता उपनिरीक्षक हरिश नाईक व वैष्णवी च्यारी यांनी बर्यापैकी जवाबदारी सांभाळली.
जनतेमधील भीती गायब
प्रशासनाबरोबर स्थानिक जनतेनेहि खबरदारी घेण्यावर भर दिला होता. पण सुरुवातीच्या काळात जी प्रचंड भीती होती ती आता गायब झाल्याचे दिसून येत आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी व पालिका कर्मचार्यांनी निर्जंतकीकरण करण्याचे काम चोखपणे बजावलेले आहे. माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी या कोरोना योद्धय़ाचा सत्कार केलेला आहे. तसेच काहि दिवसांपूर्वी जिल्ह्याधिकारी अजित रॉय यांनी कोरोनासंदर्भात कार्यरत असलेले सरकारी अधिकारी व कर्मचार्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविलेले आहे. सध्या ज्या ठिकाणी रुग्ण मिळत आहेत त्या भागात अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीकरण करून घेतले जाते.
सुरुवातीला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण सापडले होते. तसेच पाfरस्थिती नियंत्रणात होती. सर्वप्रथम सांगेमध्ये मुगोळी येथे पाfहला कोरोनाबाधित आढळून आला. तो आरोग्य खात्यामध्ये वास्को येथे कामाला जात होता. त्यानंतर उगे-पणसामळ, काले, नेत्रावळी, कोठार्ली येथे प्रकरणे मिळत गेली. सांगे येथील एका वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असता येथील सुमारे ५0 जणांनी स्वॅब टेस्ट करून घेतली असता १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर वृद्धाच्या अंत्यसंस्कारावेळी येथील अनेक जण उपस्थित राहिले होते.
पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागांतहि फैलाव सध्या सांगे पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागांतहि कोरोनाचा फैलाव झाला आहे. चतुर्क्षीपूर्वी रुग्ण ठीक होऊन संख्या कमी झाली होती. मात्र चतुर्क्षीनंतर आकडा वाढतच गेला. काले येथे सुमारे २६ रुग्ण मिळाले. सध्या सावर्डे, रिवण, काले या भागांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी सरकारी कार्यालयांतील कर्मचार्यांमध्ये देखील कोविड प्रकरणे मिळाली आहेत. मात्र सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता निर्माण होत आहे.
Previous Articleसातारा : बळींचा आकडा आठशेच्या घरात, दिवसभरात ३५ बळी
Next Article सांगली : माधवनगर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
Related Posts
Add A Comment