प्रतिनिधी /बेळगाव
धामणे रोड वडगाव येथील साईबाबा बेकर्सचे शुक्रवारी थाटात उद्घाटन करण्यात आहे. मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष गोपाळ बिर्जे यांच्या हस्ते बेकरीचे उद्घाटन झाले. यावेळी विविध मान्यवरांनी बेकरीला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी नेताजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ब्रेड स्लायडर मशिनचे उद्घाटन केव्हीजी बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक हेगडे, ओव्हनचे उद्घाटन मराठा बँकेचे माजी चेअरमन बाळाराम पाटील, पीठ मळण्याच्या मशिनचे उद्घाटन बेळगाव बेकर्स सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी हंगीरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गोपाळ बिर्जे यांनी जाधव कुटुंबीयांच्या व्यवसायाचे कौतुक करत कष्ट आणि सचोटीच्या जोरावर ही बेकरी लोकप्रिय होईल अशा शुभेच्छा दिल्या. तर बेकरी व्यवसायात जाधव कुटुंबियांनी आपले वरचे स्थान राखून ठेवले आहे असे सांगुन हा व्यवसाय वृध्दिंगत होईल असा विश्वास शिवाजी हंगीरगेकर यांनी व्यक्त केला.
विजय जाधव यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले. तर पूजा जधाव यांनी आभार मानले. यावेळी बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, बेकरी व्यवसायिक शंकर गडकरी, नेमीनाथ कंग्राळकर, शिवाजी बाडिवाले, चिमन जाधव, बी. व्ही. जाधव, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, केव्हीजी बँकेचे व्यवस्थापक पवनकुमार, प्रेस ऑनर्स असो. चे व बेकर्स असो. चे पदाधिकारी उपस्थित होते. जाधव कुटुंबियांमधून बापू जाधव, युवराज जाधव, रामकृष्ण जाधव, साईराज जाधव, किरण जाधव, सुमंत जाधव उपस्थित होते.