दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार
खाडीत फेरफटका मारण्यासाठी गेले असता दुर्घटना
प्रतिनिधी / रत्नागिरी
तालुक्यातील साखरतर-म्हामूरवाडी खाडीत होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत 8 वर्षाच्या मुलासह तिघांचा बुडून मृत्यू झाल़ा सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाल़ी यावेळी होडीतमधील इतर 8 जणांना वाचवण्यात यश आल़े त्यामधील दोघांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल़े
राहिला नदीम बारगीर (35), जबीन महम्मद हनीफ जमखंडीकर (50) व शायान यासिन शेख (8, ऱा मिरज ज़ि सांगली) अशी मृतांची नावे आहेत़ तर आहिल मिलाद बारगील (2) शमशाद बारबील (50, ऱा मिरज सांगली) यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आह़े एकूण 11 जण होडीमधून म्हामूरवाडी येथील खाडीमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले होत़े अशी माहिती समोर आली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होडी उलटून बुडालेले सर्व जण हे सांगली मिरज येथील रहिवासी आहेत़ 17 जानेवारी रोजी असलेल्या लग्नासोहळयासाठी हे सर्व जण साखरतर म्हामूरवाडी येथे आले होत़े दरम्यान सोमवारी सर्व नातेवाईकांना जेवणाचा कार्यक्रम होणार होत़ा यावेळी सकाळच्या सुमारास मृत राहिला हिचा पती नदीम बारगीर व त्याच्यासोबत असलेले अन्य 10 जणांनी म्हामूरवाडी खाडीमध्ये फेरफटका मारण्याचा निर्णय घेतल़ा यासाठी त्यांनी नातेवाईकाची होडी घेतली व ते खाडीमध्ये फिरण्यासाठी गेल़े
यावेळी नदीम बारगीर हा होडी चालवत असताना खाडीच्या मध्यभागी आल्यावर होडीचा बॅलन्स जावून ती उलटल़ी यावेळी नदीम व त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका सहकाऱयाने होडीमधील माणसांना वाचवण्याचा प्रयत्न केल़ा मात्र 10 जणांना वाचवणे त्यांना शक्य झाले नाह़ी यावेळी नदीम होडीमधील मुलांना उलटलेल्या होडीवर बसवून त्यांना सुखरूप किनाऱयावर आणल़े मात्र या दुर्घटनेमध्ये दोन महिला व एका मुलाला वाचवण्यात यश आले नाह़ी
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच म्हामूरवाडी परिसरात शोककळा पसरल़ी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनीत चौधरी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिल़ी यावेळी तीनही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आल़े याप्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आह़े
साखरतर म्हामूरवाडी खाडीमध्ये सुमारे 3 वर्षांपूर्वी अशीच होडी उलटून त्यात काही जण दगावल्याची घटना घडली होत़ी त्यानंतर सोमवारी याच खाडी परिसरात होडीमधील फेरफटका मारण्यासाठी गेलेल्यांवर ओढवलेल्या या दुदैवी प्रसंगाने साखरतर पंचक्रोशी दुखःची छाया पसरल़ी गावात गेल्या दोन दिवसांपासून एका घरात लग्नसोहळ्याची धामधुम सुरू होत़ी सोमवारी आलेल्या पाहूण्यासाठी गाव जेवणाची व्यवस्था करण्यात आली होत़ी याचदरम्यान या घडलेल्या दुर्घटनेमुळे सोहळा कार्यकमवार दुखःची छाया पसरल़ी