वार्ताहर / कबनूर
इचलकरंजी कार्यालयातील एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या साजणीतील २६ वर्षीय एक युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गावात पहिल्यांदाच कोरोना चा शिरकाव झाल्यामुळे खळबळ माजली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने बाधित व्यक्तीचा भाग बॅरिकेट लावून सील करण्यात आले.
साजणी तालुका हातकणंगले येथील 26 वर्षीय युवक इचलकरंजी येथे एका कार्यालयात काम करत होता. त्या कार्यालयात काम करणाऱ्या एका सहकार्यास कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या साजणीतील या युवकाचे स्वॅब घेण्यात आले. बुधवारी रात्री या युवकाचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे गावात खळबळ माजली व भिंतीचे वातावरण पसरले. हा युवक राहत असलेला भाग पूर्णपणे बंद करून भागात ताबडतोब ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली.
बाधित तरुणाच्या आई वडील व भाऊ यांना इचलकरंजी येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. गावातील नागरिकांनी घाबरून न जाता मास्क सॅनिटायझरचा वापर करावा व तसेच कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडू नये घरातच रहावे असे आव्हान ग्रामपंचायत समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Previous Articleपंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला वाराणसीकरांशी संवाद; म्हणाले…
Next Article मिजोरममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
Related Posts
Add A Comment