वारणानगर / प्रतिनिधी
सातवे ता. पन्हाळा येथील स्मशानभूमी पाठीमागील कंरजीच्या झाडास दोरीने गळफास लावून एका अज्ञात तरूणाने आत्महत्या केल्याचे आज रविवार दि. २९ रोजी सकाळी उघड झाले असून, आत्महत्याकरून काही दिवस झाले असल्याने मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे.
कोडोली पोलीसांना या संदर्भात माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले यावेळी पोलीसानी बेवारस मृतदेह खाली उतरला असता तो सडलेल्या अवस्थेत असून चेअरा देखील स्पष्ट ओळखत नाही अंदाजे साडेपाच फूट उंची व वय ३० ते ३५ असावे तसेच अंगात चॉकलेटी टी शर्ट, व सैन्यदलाशी साम्य असलेल्या रंगाची फूल पॅन्ट एवढेच वर्णन पोलीसांनी सांगीतले.
मृतदेहाची ओळख पटवणे अवघड आहे. तथापी या संदर्भात कोणाला माहिती उपलब्द झालेस कोडोली पोलीस ठाणेस संपर्क साधावा असे आवाहन पो.ना. उदय काटकर, ऋषीकेष पाटील यानी केले आहे.