वंशाचा दिवाच हरपल्याने कुटूंबाचा अक्रोश ह्रदय पिळवटणारा
प्रतिनिधी / वारणानगर
लग्न होऊन दीड महिन्याचा कालावधी होत आला अंगावरील लग्नातील हळद अजून सुकलेली नाही नव्या संसाराची स्वप्ने सुरू असतानाच सुनिल आमतेवाडी येथील मित्रा समवेत जेवणाची पार्टी संपवून घरी परतत असताना मोटर सायकल स्लीप होऊन पडल्याने सुनिल रघुनाथ पाटील वय ३o रा. सातवे या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याने सातवेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवार दि. ६ रोजी रात्री अकराच्या सुमारास सातवे-बच्चे सावार्डे रोडवर मोरया गॅरेज समोर सुनिलची मोटर सायकल जोरदार स्लीप (घसरली) झाली. यात सुनिलचे बाजूच्या खडीवर डोके आपटल्याने डोक्याला जबर दुखापत झाली होती. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचा पुढील भाग पूर्णता निकामी झाला आहे एवढा हा भिषण अपघात होता.
सुनिलचे वडीलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. दोन विवाहित बहिणी, आई असा त्याचा परिवार आहे. गावातील मुलीशी दीड माहिन्यापूर्वी त्याने विवाह केला होता. कुटूंबाचा एकूलता एक वंशाचा दिवा अपघातात गेल्याने कुटूंबाचा अक्रोश ह्रदय पिळवटनारा होता. आज सोमवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कोडोली पोलिसात या आपघाताची नोंद झाली आहे.