प्रतिनिधी/सातारा
गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र सातारकरांसाठी आज मोठी दिलासादायक बातमी आहे. आज सातारा जिल्ह्यातील 15 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 15 रुग्णांची 14 व 15 दिवसानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे 15 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले.
तर, कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 11 जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
आतापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे जिल्ह्यातील एकूण 35 रुग्ण कारोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.