प्रतिनिधी / सातारा
पाटण तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनिस या मार्च महिन्यापासून कोरोनाचा सर्व्हे करत आहेत. या सर्व्हे सोबत आता त्यांना ऑक्सीमीटर व थर्मामीटर देवून बीपी, शुगर, ऑक्सीजन तपासण्याची जबरदस्ती करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन आशा वर्कस सोबत अंगणवाडी सेविका, मदतनिस सर्व्हे करत आहे. सुरुवातील मास्क, सॅनिटायझर न देता हा सर्व्हे आशा, सेविका करत होत्या. प्रशासनाने यांच्या आरोग्याचा विचार न करता सर्व्हे सुरु ठेवला नंतर यांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध झाले. मार्च महिन्यापासून हा सर्व्हे सुरु असून याला सहा महिने झाले आहेत. फक्त सातारा शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात बाधिताचा आकडा 6 हजाराच्या घरात पोहचला आहे. पुणे-मुंबई येथील चाकरमानी, घरात कोणी आजारी आहे. अशी सर्व माहिती दररोज घेतली जात आहे. दरम्यान पाटण तालुक्यात सेविका व मदतनिस यांना सर्व्हे सोबत आता त्यांना ऑक्सीमीटर व थर्मामीटर देवून बीपी, शुगर, ऑक्सीजन तपासण्याची जबरदस्ती करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यात हे काम सेविकांना दिलेले नाही. किंवा त्याचे ट्रेनिंगही दिलेले नाही.
जिल्हाभर हे काम आशा वर्कस करत आहेत. मात्र सेविका व मदतनिस यांना हे काम देऊ नये अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटना (सीटु) सातारा जिल्हा कमिटी च्या अध्यक्षा आनंदी अवघडे यांनी पाटणच्या प्रातांधिका-यांना निवेदनाद्वारे केली. मात्र प्रांताधिकारी यांनी उडाउडवीची उत्तरे देत हे काम सेविका, मदतनिस यांना करावेच लागेल असे सांगितले असा पाटण तालुक्यातील सेविका, मदतनिस, व संघटनेच्या पदाधिका-यांना दम भरला. या कामाची सक्ती करत प्रातांधिकारी जबरदस्तीने हे काम करायला भाग पाडत असल्याचे सेविका, मदतनिस यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या सर्व्हे दरम्यान पाटण मधील एक सेविका प्यारालिसचा अटॅक येऊन जाग्यावर आहे. कोरोनाच्या सर्वक्षण व इतर माहिती पुरवण्याचे काम सेविका करतील. ज्या सेविकांना बीपु, शुगरचा त्रास आहे. त्यांना या सर्व्हेतून वगळ्यात यावे अशी मागणी अवघडे यांनी केली आहे.
Previous Articleदिल्लीत दिवसभरात 956 नवे कोरोना रुग्ण; 14 मृत्यू
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ४ कोरोना बाधितांचा मृत्यू
Related Posts
Add A Comment