सातारा : गोंदवले बु, ता. माण येथील श्री. गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा कोविड-19 या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेला आहे, अशी माहिती कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार माण (दहिवडी) यांनी यांनी दिली.
मंदिर प्रशासनाने धार्मिक विधी मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीतच विश्वस्त किंवा संबंधित व्यक्ती यांच्या वैयक्तिक जबाबदारीवर मंदिराच्या आवारात करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून, त्या अनुषंगाने गोंदवलेकर महाराज ट्रस्टी यांनी यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव कार्यक्रम स्थगित करण्यास संमती दिली आहे. तरी भाविकांनी कोविड-19 या संसर्गजन्य साथीचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी गोंदवले बु. ठिकाणी जमा होवू नये व गर्दी करु नये.
शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार माण (दहिवडी) यांनी केले आहे.