● सातारा तालुक्यात 201 बाधित
● कराड तालुक्यात 73 बाधित
● राजेवाडीत संसर्ग साखळी
● एक हजारजण होम आयसोलेट
● बेडसची कमतरता भासणार नाही
● व्याधीग्रस्तांच्या सर्व्हेस सहकार्य करा
● मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न सुरु
सातारा प्रतिनिधी
गेल्या दोन, तीन दिवसात पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून रविवारी उच्चांकी 443 बाधित आल्याने बाधितांचा एकूण आकडा 10 हजार 157 झाल्याने चिंता वाढली आहे. कराड व सातारा हॉटस्पॉट ठरले असून सातारा तालुक्यातील निगडीनजिक राजेवाडी गावात संसर्ग साखळी निर्माण झाल्याने हे गाव हॉटस्पॉट ठरलेय. तपासणींचा वेग वाढल्याने बाधित वाढत असून त्यांना लक्षणांप्रमाणे कोरोना केअर सेंटर, हॉस्पिटल्स व होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये. संसर्ग वाढूच नये यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुवणे व सोशल डिस्टन्सचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
दरम्यान, जिह्यात काल रविवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार 443 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात उच्चांकी 496 जणांचे अहवाल बाधित आले आहेत. तर सोमवारी दिवसभरात 240 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील 240 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये *कराड*तालुक्यातील 42, *खंडाळा* तालुक्यातील 11, *खटाव* तालुक्यातील 9, *कोरेगाव* तालुक्यातील 18, *महाबळेश्वर* तालुक्यातील 4, *पाटण* तालुक्यातील 6, *सातारा* तालुक्यातील 35, वाई तालुक्यातील 26 व इतर 89 असे एकूण 240 नागरिकांचा समावेश आहे.
घाबरु नका, काळजी घ्या : जिल्हाधिकारी शेखर सिंह
सध्या जिल्हय़ात तपासणींचा वेग वाढवण्यात आला आहे. रविवारी 2400 जणांचे तपासणी केल्यानंतर 443 जणांचा अहवाल बाधित आला आहे. लक्षणांनुसार उपचार व विलगीकरण करण्यात येत असून सध्या जिल्हय़ात लक्षणे नसलेले पण बाधित अहवाल आलेले एक हजार नागरिक होम आयसोलेट करण्यात आलेले आहेत. या नागरिकांनी होम आयसोलेशनचे नियम व शिस्त पाळावी तसेच त्यांना इतर काही त्रास झाल्यास 1077 क्रमांकावर फोन केल्यास त्यांना तातडीने उपचारांची सुविधा उपलब्ध केली जाईल. रुग्ण संख्या वाढत असली घाबरुन न जाता काळजी घेवून कोरोनाविरुध्दचा लढा जिंकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.
व्याधीग्रस्तांच्या सर्व्हेस सहकार्य करा
जिल्हय़ात 60 वर्षांपुढील नागरिकांना इतर व्याधी असतील तर त्यांचा सर्व्हे करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. गेल्या काही दिवसात अशा सर्व्हेत 170 ते 180 नागरिकांची लक्षणे असल्याने तपासणी केल्यावर तो बाधित आढळून आले आहेत. इतर मधुमेह, रक्तदाब वा अन्य व्याधी असल्यास तसेच लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी जवळच्या डॉक्टर, आरोग्य केंद्रात जावून कोरोना टेस्ट करुन घ्यावी. जेवढे जलद निदान होईल तेवढेच लवकर उपचार हे सुत्र घेवून आरोग्य विभाग करत असून आरोग्य विभागावर प्रचंड ताण वाढला असल्याचे सिंह यांनी सांगितले.
बिलाबाबत तक्रार असल्यास संपर्क साधा
खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी शासनाने सुविधांचे दर ठरवून दिलेले आहेत. याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आली असून नियमांपेक्षा जास्त बिल वसूल केल्यास हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते यासंदर्भातील ऑडिट करत आहेत. ज्या नागरिकांच्या बिलाबाबत काही तक्रारी असतील त्यांनी 1077 क्रमांकावर फोन करावा किंवा जिल्हाधिकाऱयांच्या मेलवर बिलाच्या फोटोकॉपी पाठवून तक्रार करावी, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.
बेडसची कमतरता भासणार नाही
जिल्हय़ात काही वेळा बेड नसल्याबाबत तक्रारी येत आहेत. मात्र प्रशासनाने खासगी हॉस्पिटल देखील अधिग्रहीत केलेली आहेत. तसेच बेडसची कमतरता भासू नये व गंभीर स्थितीतील रुग्णांना तातडीने बेड मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच होम आयसोलेशनचा पर्याय दिला आहे. मात्र काहीजण बेडसाठी आग्रह धरतात. लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेट व्हावे, आवश्यकता नसल्यास बेडचा आग्रह धरु नये. तसेच जिल्हय़ात ज्या ठिकाणी बेडस उपलब्ध आहेत याची माहिती 1077 वर घेवून तिकडे देखील जाण्याची तयारी नागरिकांनी ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.
राजेवाडी ठरली हॉटस्पॉट
सातारा तालुक्यातील जिहे, कण्हेर, चोरगेवाडी या गावानंतर आता निगडी तर्फ राजेवाडी गावात कोरोनाने कहर केला आहे. या गावात संसर्ग साखळी वाढली असून गावात आतापर्यत 105 बाधित समोर आले असून यामध्ये दि. 23 रोजी एकाच दिवसात 81 बाधित आढळून आले आहेत. या गावातील संसर्ग साखळी सोडण्यासाठी ग्रामपंचायतीसह आरोग्य विभाग, पोलीस दल प्रयत्न करत आहे. तर इतर तालुक्यातील काही गावांत छोटय़ा, मोठय़ा संसर्ग साखळय़ा प्रशासनासमोर आव्हान निर्माण करत आहेत.
जिल्हय़ातील 9 बाधितांचा मृत्यु
सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे ओंड ता. कराड 51 वर्षीय पुरुष, सोळशी ता. कोरेगाव 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा 68 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्हय़ातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तामजाईनगर सातारा 36 वर्षीय पुरुष, बनवडी ता. कराड 79 वर्षीय पुरुष, विक्रमनगर पाटण 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई 71 वर्षीय पुरुष, तासगाव ता. सातारा 30 वर्षीय महिला असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
रविवारी रात्री अहवालात 443 बाधित
*सातारा तालुका 201 बाधित :* सातारा 10, विलासपूर 4, नागठाणे 1, केसरकर कॉलनी 1, आंबेदरे 3, राजेवाडी निगडी 81, क्षेत्रमाहुली 2, सासपडे 1, धामणी 1 सिंबेवाडी 1, सुपुगडेवाडी 1, रामशेटेवाडी 1, भोसगाव 2, भाटमरळी 1, शनिवारपेठ 3, माहुली 1, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 5, खेड 1, आबाचीवाडी 1, यादोगोपाळपेठ 1, कारंडवाडी 3, करंजेपेठ 4, पळशी 2, बोरगाव 1, सदरबझार 3, शुक्रवारपेठ 1, विसावानाका 1, कोंडवे 2, शाहुपुरी 3, गोडोली 1, अतीत 1, पळशी 5, सम्राटनगर 1, मंगळवार पेठ 1, कोडोली 1, करंजे 1, रविवार पेठ 1, केसरकर पेठ 1, शिवथर 1, धोंडेवाडी 1, अमृतवाडी 1, गुरुवार पेठ 1, नागठाणे 1, खोडद 9, नागठाणे 3, अतित 4, सासपडे 6, अपशिंगे 4, सोमवार पेठ 1, मल्हारपेठ 1, कोंडवे 1, संगमनगर 1, किन्ही 1, केसरकर पेठ 1, करंजे 1, कुमठे 1, एमआयडीसी 1, मंगळवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, सिटीपोलीस लाईन 1.
*कराड तालुका 73 बाधित :* हरपळवाडी 1, ओंड 2, कराड 12, हजारमाची 3, आगाशिवनगर 2, मसुर 1, सावडे 2, वाठार 2, जुलेवाडी 1, मंगळवार पेठ 2, खोडशी 1, मलकापूर 1, शनिवार पेठ 1, राजाचे कुर्ले 1, कोयना वसाहत 1, कोडोली 1, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 1, वडगाव हवेली 1, आनंद काले 1, गुरुवार पेठ 1, वाघेरी 1, मंगळवार पेठ 1, बेलमाची 1, होटेवाडी 1,उंडाळे 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बनवडी 2, कराड 1, पाल 1, किवळ 2, बेलवडे बु 3, बनवडी 3, कोपर्डे हवेली 1, शनिवार पेठ 3, उपजिल्हा रुग्णालय 1, गोवारे 1, हजारमाची 1, आगाशिवनगर 3, मलकापूर 2, रेठरे बु 1.
*वाई तालुका 44 बाधित :* भुईंज 3, सुरुर 1, उडतारे 6, वेलंग 4, पाचवड 4, आसले 3, शेलारवाडी 4, वहागाव 3, वाई 1, बावधन 6, कवठे 2, सोनगीरवाडी 1, पाचवड 1, दह्याट 1, बावधन नाका 1, यशवंतनगर 1, उडतारे 1, जांभ 1.
*खटाव तालुका 34 बाधित :* मायणी 2, पुसेसावळी 3, येनकुळ 1, नांदोशी 2, बुध 2, विसापूर 1, औंध 2, पुसेगाव 1, नेर 4, वडुज 1, राजापुर 1, खटाव 4, विसापुर 2, औंध 1, भोसरे 2, डिस्कळ 2, पुसेसावळी 1, वेटणे 1, येळीव 1.
*माण तालुका 24 बाधित :* पळसावडी 1, म्हसवड 1, वाडी 1, म्हसवड 18, स्वरुपखानवाडी 3. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 2, पाटण 1, खांडववाडी 2.
*कोरेगाव तालुका 21 बाधित :* सातारारोड 4, भक्तवडी 1, चिमणगाव 4, रेवडी 1, बोलेवाडी 1, पिंपोडे बु 8, आंबवडे 1, महादेवनगर 1.
*खंडाळा तालुका 22 बाधित :* शिरवळ 3, केसुर्डी 1, लोणंद 7, संभाजी चौक 1, सुखेड 1, हराळी 1, अजनुज 1, भादे 3, जावले 1, शिंदेवाडी 1, शिवाजीनगर 2. इतर 4 जाधववाडी 1.
*फलटण तालुका 6 बाधित :* फलटण 1, कोळकी 1, अलगुडेवाडी 1, धुळदेव 1, मंगळवार पेठ 1, तरडगाव 1. *महाबळेश्वर तालुका 5 बाधित :* महाबळेश्वर 5.
*800 जणांचे नमुने तपासणीला*
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8, कराड 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण 78, कोरेगाव 53, वाई 104, खंडाळा 99, रायगांव 54, पानमळेवाडी 82, मायणी 32, महाबळेश्वर 45, पाटण 28, दहिवडी 32 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 104 असे एकूण 800 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*सोमवारपर्यंत जिल्हय़ात*
एकूण नमुने 40261
एकूण बाधित 10653
एकूण मुक्त 5947
एकूण बळी 306
उपचारार्थ 4400
*सोमवारी*
एकूण बाधित 496
एकूण मुक्त 240
एकूण बळी 09
Trending
- देशातील पहिली ‘हरीत शाळा’ मुलांनी गजबजली
- परराज्यातील पोलीस सराफींना लुटतात
- आमदार विरेश बोरकर यांचा केपे मतदारसंघात दौरा
- सांखळी परिसरातील शाळांमध्ये किलबिलाट
- रेल्वे बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे निवसरमध्ये कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबली
- श्रीगणेशाचे दर्शन घेऊन शाळेत केला प्रवेश
- वैष्णवी पोतेकर हिचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
- फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरचा कारभार अध्यक्षाविना