● आठवडा ठरला धडकी भरवणारा
●एका आठवडय़ात तब्बल 1346 बाधित तर 34 बळी
● दिवसभरात 8 बळी, 122 मुक्त
● रात्रीच्या अहवालात 263 बाधित
●जिल्हाधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
●जिल्हाधिकऱ्यांचा चालक झाला बाधित
●नवीन साखळय़ा तुटता तुटेनात
●कराड शहराबरोबरच सातारा शहरातही वेग वाढला
● खासदार शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे घेणार आज जिल्ह्याचा आढावा
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्हय़ाचा 15 दिवसांपूर्वी मंदावलेला वेग पुन्हा वाढला आहे. निर्माण झालेल्या साखळय़ा तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना नव्याने साखळय़ा निर्माण होत गेल्या आणि बाधितांची संख्या वाढू लागली. 1 ऑगस्टपासून अवघ्या आठवडय़ात तब्बल 1346 बाधित वाढले आहेत. तर बळींचे प्रमाणही झपाटय़ाने वाढू लागले असून या आठवडय़ात 34 बळी झाले आहेत. दररोज 200 च्या दरम्यान नागरिकांचा अहवाल बाधित येवू लागले आहे. शुक्रवारी रात्री 199 बाधित आले. तर आठ बाधितांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. यातील तीन जण कराड तालुक्यातील आहेत. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात रेकॉर्ड ब्रेक 263 बाधितांमुळे जिल्हा साडेपाच हजारावर गेला आहे. दरम्यान, रविवारी खासदार शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हा दोर्यावर असून यात कोरोनाचा आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्हय़ातील कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना बाधितांचा आकडा काही केल्या कमी होत नाही. कराड शहराबरोबरच तालुक्यात दररोज 50 च्या वर बाधित होवू लागले आहेत. तसेच वाई तालुक्यातील दररोज येणारा आकडा धास्ती वाढवणारा आहे. सातारा शहरातही कोरोनाचे स्लो पॉइझनिंग सुरू आहे. जिल्हय़ातील जिहे, पुनवडी सारख्या साखळय़ा तोडण्यात यश आले आहे. मात्र नव्याने निर्माण होत असलेल्या वाठार किरोली, वाई तालुक्यातील जांब, बावधन, जावली तालुक्यातील कुडाळ या साखळय़ा तोडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. येथे ऍन्टिजन टेस्ट केली जात आहे.
*जिल्हाधिकाऱयांचा अहवाल निगेटीव्ह तर चालकाचा पॉझिटिव्ह*
जिल्हाधिकारी कार्यालयातल्या 50 कर्मचाऱयांची अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱयांचे वाहन चालकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, जे जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा शोध सुरू आहे. जिल्हाधिकाऱयांचे वाहन निर्जंतुक करण्यात आले आहे. सततच्या बैठका, पाहणी दौरे, कोण कोण कसे भेटायला येते यामधूनच चालकास कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
*उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शिरकाव*
शिरवळ येथील फौजदार बाधित झाला होता. त्यानंतर पोलीस दलात मोठय़ा प्रमाणावर कोरोना बाधित सापडू लागले. वाई पोलीस स्टेशनचे तर 17 जवान बाधित झाले होते. त्याचबरोबर भुईंज, मेढा पोलीस स्टेशनमधीलही पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. आता तर कोरोनाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शिरकाव केला असून येथील महिला कर्मचाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपविभागीय कार्यालय निर्जंतुक करण्यात आले आहे. या विभागात 30 कर्मचारी असून सर्वांची धाकधूक वाढली आहे. त्यांचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या परिसरात आहे.
*कृष्णा हॉस्पिटलचा कोरोनामुक्तीचा आकडा 600 पार*
कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी 37 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकुण 634 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या वतीने या रुग्णांना बुके देवून निरोप देण्यात आला.
*8 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोडोली (ता. सातारा) येथील 86 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील घारळेवाडी येथील 65 वर्षीय महिला, व शेणगाव ता. कराड येथील 72 वर्षीय महिला यांचा तसेच मंगळवार पेठ, कराड येथील 84 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात,सातारा येथील खाजगी रुग्णालयात पांढरवाडी ता. खटाव येथील 74 वर्षीय पुरुष, रामदास कॉलनी फलटण येथील 74 वर्षीय पुरुष, वाघोशी ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा 48 वर्षीय पुरुष असे एकूण 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
*जिह्यातील 199 संशयितांचे अहवाल बाधित*
जिह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 199 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
*कराड तालुक्याचा बाधितांचा आकडा धडकी भरवणारा*
कराड : उंब्रज 27 वर्षीय पुरुष, इंदोली 45 वर्षीय पुरुष, वाजोशी 32 वर्षीय पुरुष, उंब्रज 35 वर्षीय पुरुष, रेठरे बु 23 वर्षीय पुरुष, इंदोली 25, 28 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड 39 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, कराड 28 वर्षीय महिला, गावारे 68 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड 20 वर्षीय महिला, गुथले 26 वर्षीय पुरुष, बनवडी 69 वर्षीय पुरुष, कालवडे 38 वर्षीय पुरुष, चोरे 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड 30 वर्षीय महिला, 35, 30 वर्षीय पुरुष, वाहगाव 32 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड 69, 40 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, कराड 55 वर्षीय पुरुष, चोरे 25 वर्षीय पुरुष, रविवार पेठ 19 वर्षीय महिला, गोंदी 25 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 57 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, रविवार पेठ 60 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ 8 वर्षाचा बालक, मंगळवार पेठ 43 वर्षीय महिला, सोमवार पेठ 21 वर्षीय महिला, सोमवार पेठ 63 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, सोमवार पेठ 65 वर्षीय पुरुष, विद्यानगर, 26 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ 54 वर्षीय महिला, रविवार पेठ 36 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ 58 वर्षीय पुरुष, रेवनीव कॉलनी 60 वर्षीय महिला, खोडजायवाडी वर्षीय पुरुष, हनबरवाडी 24 वर्षीय महिला, टेंभू 70 वर्षीय महिला, शिनोली 40 वर्षीय पुरुष, वाठार 30 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली 55 वर्षीय पुरुष, कवटे 62 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर 33 वर्षीय पुरुष, कोरीवले 23 वर्षीय पुरुष, वडगाव 42 वर्षीय पुरुष, कोळे 31 वर्शीय पुरुष, आगाशिवनगर 31 वर्षीय महिला, मलकापूर 40, 32 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड 58 वर्षीय पुरुष, काले 48 वर्षीय पुरुष, कराड 42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ 40 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ 25 वर्षीय महिला, काले 37 वर्षीय महिला, तळबीड 34 वर्षीय पुरुष, कार्वे 55 वर्षीय महिला, तारुक 44 वर्षीय पुरुष, विंग 52 वर्षीय पुरुष, मलकापूर 9 वर्षाची मुलगी, 56 वर्षाची महिला, आगाशिवनगर 65 वर्षीय महिला, मलाकपूर 4 वर्षाची मुलगी, मलकापूर 57 वर्षीय महिला, 84 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ 58 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ 43 वर्षीय पुरुष, वाघेश्वरवाडी 54 वर्षीय पुरुष.
*सातारा तालुक्यात 20 जण बाधित*
सातारा : मंगळवार पेठ येथील 50 वर्षीय महिला 60 वर्षीय पुरुष, सदरबझार 56 वर्षीय पुरुष, गोडोली 23 वर्षीय पुरुष, सोनापूर 30 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, चिंचणेर निंब 35 वर्षीय महिला, परखंदवाडी 63 वर्षीय पुरुष, कोपर्डे 77 वर्षीय पुरुष, गोडोली 58 वर्षीय पुरुष, विकासनगर 30 वर्षीय पुरुष, सोळशी 65 वर्षीय पुरुष, गोडोली 15 वर्षाची युवती, सदरबझार 31 वर्षीय महिला, माचीपेठ 56 वर्षीय पुरुष, देगाव फाटा, एमआयडीसी 59 वर्षीय पुरुष.
*गारवडे येथील 9 वर्षाची मुलगी बाधित*
पाटण : 56 वर्षीय पुरुष, गारवडे 9 वर्षाची मुलगी, पापर्डे 70 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, आरबवाडी 21 वर्षीय पुरुष, पापर्डे 26 वर्षीय महिला, मारुल हवेली 58 वर्षीय पुरुष, रामपूर 53 वर्षीय पुरुष, बेलवडे 25 वर्षीय महिला, कडवे 59 वर्षीय पुरुष.
*उडतारेमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव*
वाई : उडतारे 36 वर्षीय महिला, बावधन 73, 40 वर्षीय महिला, पसरणी 17 वर्षी युवती, बावधन 11 वर्षाचा मुलगा, 70 वर्षीय पुरुष, गणपती आळी 32 वर्षीय पुरुष, जांब 35 वर्षीय महिला, 14 वर्षाचा युवक, 41 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, 22 वर्षाची महिला, 17 वर्षीय युवक, पासरणी 20 वर्षीय युवक, भुईंज 66, 36, 13 वर्षीय महिला, जांब 62 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी 50 वर्षीय महिला, फुलेनगर 54 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी 68 वर्षीय पुरुष, बावधन 50 वर्षीय महिला.
*शिरवळमध्ये चार जण बाधित*
खंडाळा : पळशी रोड, शिरवळ 31 वर्षीय पुरुष, न्यु कॉलनी, शिरवळ 25 वर्षीय पुरुष, बाजार पेठ, शिरवळ 46 वर्षीय पुरुष, शिरवळ 50 वर्षीय महिला, गुताळे 35 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी 65 वर्षीय महिला, शिवाजी चौक, खंडाळा 36 वर्षीय पुरुष
खटाव : मायणी येथील 24 वर्षीय पुरुष.
*फलटण तालुक्याची साखळी तुटण्याची शक्यता*
फलटण : मंगळवार पेठ, फलटण 17 वर्षीय युवती, गुणवरे 24 वर्षीय पुरुष, पेडगाव 29 वर्षीय महिला, स्वामी विवेकानंद नगर, फलटण 30 वर्षीय महिला, सोनवडी खुर्द 55 वर्षीय महिला.
कुमठय़ात आठ जण झाले बाधित
कोरेगाव : वेलंग 27 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, वाठार किरोली 28 वर्षीय महिला, 4 वर्षाची बालिका, 50, 41, 37 वर्षाची महिला, 17, 15 वर्षाया युवक, देवूर 17 वर्षी यवुक, 54 वर्षीय पुरुष, जरेवाडी 52 वर्षीय पुरुष, कुमठे 24 वर्षीय पुरुष, 14 वर्षाचा युवक, 30 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 42, 17 वर्षीय पुरुष, 33, 30 वर्षाचा पुरुष, कोरेगाव 70 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय महिला
*कुडाळचा आकडा थांबेना*
जावली : कुडाळ 39 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 3 वर्षाचा बालक, 5, 3 वर्षाची बालका, 41 वर्षीय पुरुष (पत्ता नाही)
*खासगी तपासणी अहवालात 9 जण बाधित*
खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये अजिंक्य कॉलनी, कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, पांढरवाडी (ता. माण) येथील 72 वर्षीय महिला, सोनगाव निंब क्षेत्र माहुली येथील 58 वर्षीय पुरुष, कुरवली (ता. खटाव) येथील 68 वर्षीय महिला, संगमनगर, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, औंध येथील 62 वर्षीय महिला, खबालवाडी (ता. पाटण) 30 वर्षीय पुरुष. पनवेल जि. रायगड 59, 25 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*122 नागरिकांना आज डिस्चार्ज*
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 122 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले.त्यामध्ये जावळी तालुक्यातील 15, कराड तालुक्यातील 74, खटाव तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 2, पाटण तालुक्यातील 7, सातारा तालुक्यातील 17, वाई तालुक्यातील 5 नागरिकांचा समावेश आहे.
*465 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 45, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 43, कोरेगांव 15, वाई येथील 38, शिरवळ-खंडाळा येथील 78, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 36, मायणी येथील 20, महाबळेश्वर येथील 14, पाटण येथील 19, खावली येथील 30, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 107 असे एकूण 465 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
*आठवडय़ातील बाधित व बळींची संख्या*
1 ऑगस्ट………….202…………..06
2 ऑगस्ट…………178……………03
3 ऑगस्ट…………148…………….00
4 ऑगस्ट…………220……………08
5 ऑगस्ट…………196……………05
6 ऑगस्ट…………203……………07
7 ऑगस्ट…………199…………..01
*जिल्हय़ात शनिवारी*
एकुण बाधित 263
एकुण मृत्यू 08
एकुण मुक्त 122
*जिल्हय़ात शनिवारपर्यंत*
बाधित 5641
मुक्त 2615
मृत्यू 171
उपचारार्थ 2856