प्रतिनिधी / सातारा
विविध संघटनांनी विविध उपक्रम राबवून साताऱयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. दिव्यांग सामाजिक प्रेरणा संस्थेने रक्तदान शिबिर, दिव्यांग उद्योजगांचा सत्कार घेवून साजरा करण्यात आला तर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला.
दिव्यांग सामाजिक प्रेरणा संस्थेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास सकाळपासून प्रतिसाद मिळाला. या शिबिराला अजय पवार, आनंदा पोतेकर, अनिल ढेब यांच्यासह जिह्यातील कार्यकर्ते सहभागी होवून रक्तदान केले. तसेच जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्यासह विविध संघटनांच्या अनिता धनावडे, नंदू धनावडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे आदी उपस्थित होते.