प्रतिनिधी / सातारा
कोयना धरणात आज 87.26 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 87.15 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 130 नवजा येथे 183 व महाबळेश्वर येथे 198 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 9.65 (82.54), धोम-बलकवडी 3.65 (92.30), कण्हेर – 8.87 (92.42), उरमोडी – 9.06 (93.84), तारळी- 5.33 (91.15), निरा-देवघर 7.80 (66.55), भाटघर-18.67 (79.43), वीर – 9.29 (98.81),
कोयना धरण कोयना धरणात सध्या 92.38 tmc (87.77 %) पाणीसाठा आहे. सध्या कोयना धरणातून कोयना नदी पात्रात 55900 cusecs ने विसर्ग चालू आहे. सध्या हाच विसर्ग चालू राहील. सध्या विसर्गात वाढ करण्याचे नियोजित नाही. जरी निसर्गात काही बदल झाला तरी पूर्वसूचना देण्यात येईल. तरी कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे