प्रतिनिधी / सातारा :
साताऱयाने तसे पाहिले तर कोरोना हरवलेलंच आहे. मात्र, मुंबईवाल्यांमुळे सातारा तालुक्यात कोरोनाने नाकवर काढले आहे. तब्बल 21 गावामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. विशेष म्हणजे हॉटस्पाट ठरु पहात असलेला परळी भाग आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे. सातारा तालुक्याचा बाधितांचा आकडा 71 असा गाठला असून शहरातील आकडा 21 वर पोहचला आहे. त्यातील 19 जण कोरोनामुक्त झाले असून 2 जण उपचार घेत आहेत. सध्या तालुक्यात 19 जण केवळ उपचारार्थ आहेत. 50 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी.जी. पवार यांनी दिली.
खेड (ता.सातारा) येथे पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला व त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याचबरोबर कोडोली येथे 2 जण आढळून आले 1 जण मुक्त झाले. लांडेवाडी येथे 5 जण आढळून आले. रायघर येथे 3 जण, जकातवाडीत 2 आढळून आले व दोघेही मुक्त झाले. चिंचणेंर निंब येथे 2 आढळून आले दोघेही मुक्त झाले.आसनगाव कुमठय़ात 1 जण, कुस खुर्दमध्ये 4 जण आढळून आले चारीही मुक्त झाले. शाहुपूरीत 2 जण बाधित झाले ते मुक्तही झाले. धनावडेवाडीत 2 जण, शेंद्रेत 1 जण, खडगावात 3 जण बाधित होते तिघेही बरे झाले. चाकळेवाडीत 1 जण, जिमणवाडी(कारी) येथे आढळून आलेल्या चारपैकी एकाचा मृत्यू तर तीन बरे झाले, माळय़ाच्यावाडीत 1, शेळकेवाडीत 2, कुस बुद्रुकमध्ये 3 पैकी 1 बरा, वावरदरेत 2, निगुडमाळमध्ये 3 पैकी 3 मुक्त, कुसवडेत 5, कारंडवाडीत 1 तर करंडीत 1, देगाव येथे एक असे बाधित आढळून आलेल्यांची संख्या 71 असून मुक्त झालेल्यांची संख्या 50 आहे. शहरात 21 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 19 बरे झाले तर 2 उपचारार्थ आहेत. 60 वर्षावरील तपासल्यामध्ये परळी आरोग्य केंद्रात 2 हजार 658 पुरुष तर 1 हजार 385 महिला, लिंब आरोग्य केंद्रात 4 हजार 379 पुरुष तर 3 हजार 307 महिला, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 हजार 210 पुरूष तर 2 हजार 64 महिला, कुमठे आरोग्य केंद्रात 2 हजार 719 पुरुष तर 2हजार 779 महिला, ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात 693 पुरूष तर 511 महिला, नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 हजार 621 पुरुष तर 3हजार 100 महिला, चिंचणेर वंदनमध्ये 5 हजार 464 पुरुष तर 4 हजार 528 महिला, कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 हजार 360 पुरुष तर 4 हजार 413 महिलांची तपासणी करण्यात आली. बाहेरुन आलेल्यांमध्ये परळी 81, लिंब 31, नांदगाव 42, कुमठे 34, ठेसेघर 11, नागठाणे 35, चिंचणेर वंदन 42 आणि कण्हेर 75 जणांची तपासणी करण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.