ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा-पंढरपूर एसटी बसवर 7 ते 8 दरोडेखोरांनी दगडफेक करत ताबा मिळवल्याचे वृत्त काही वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांद्वारे समोर आले होते. मात्र, हा दरोड्याचा प्रकार नसून, टवाळखोरांनी हुल्लडबाजीतून बसवर दगफेक केल्याचे म्हसवड पोलिसांकडून सांगण्यात येते.

पंढरपूरहून साताऱ्याकडे एसटी बस जात असताना माळशिरसजवळील पिलीव घाटात सात ते आठ लोकांनी झाडाच्या आडून बसवर दगडफेक केली. यात बसच्या मागे मोटारसायकलीवरुन चाललेल्या युवकांच्या तोंडावर आणि बस चालकाला दगड लागला. या हल्ल्यात बसचालक जखमी झाला आहे. ही बस सध्या म्हसवड हद्दीत येऊन थांबली असून, म्हसवड, पिलीव व माळशिरस पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.