वार्ताहर/ शाहूपुरी
सातारा नगरपालिकेत कोरोना विषाणूने पुन्हा शिरकाव केला आहे. प्रभारी पाणीपुरवठा अभियंता कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे निर्जंतुकीकरण करुन हा परिसर सील करण्यात आला. दरम्यान, या विभागात काही कर्मचायांमध्येही लक्षणे दिसून आल्याने
खळबळ उडाली आहे.
सातारा शहरात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सातारा नगरपालिकेत दोन महिन्यांपूर्वी महिला अधिकारी कोरोना बाधित झाली होती. त्यानंतर नगरपालिकेत अनावश्यक होणाया गर्दीवर नियंत्रणासाठी पालिकेला अपयश आले आहे.
कार्यालयाचे सतत निर्जंतुकीकरण केले जात नाही. नगरपालिकेत घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास येणाया नागरिकांची वर्दळ असली तरी संबंधित नागरिकांच्या मोजक्याच नोंदी नव्या प्रवेशद्वारावर घेतल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची विनाकारण गर्दी होणार नाही,
याकडे नगरपालिकेच्या अधिका-यांचे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सॅनिटाझर ची सोय नाही. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास येणारे सामाजिक अंतराचे पालन, मास्क वापर करताना दिसत नाहीत. पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सेवा फक्त नावालाच.
www.sataraहज्.म्द.ग्ह ही वेबसाईट बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेत गर्दी होत आहे.कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अधिकायांच्या
बदल्यांमुळे नगरपालिकेला पुन्हा अडचणीत आणले आहे. पाणीपुरवठा विभागातील अभियंतापदाचा चार्ज कराड पालिकेतील अधिकायाकडे आहे. संबंधित अधिकारी आठवडय़ातील 2-3 दिवस सातारा पालिकेत उपस्थित असतात. शुक्रवारी त्यांचा कोरोना
रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. शिवाय या विभागातील काही कर्मचायांनाही त्रास होत असून लक्षणे दिसू लागल्यावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागात कोरोनाबाधित अधिकारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून
निर्जंतुकीकरणानंतर हा विभाग शुक्रवारी सील करण्यात आला. दरम्यान, नागरिकांनी कामाशिवाय नगरपालिकेत गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सिंग
पाळावे, असे आवाहन विभाग प्रमुखांनी केले आहे.