● तीन बाधितांचा मृत्यू
● गेल्या 24 तासात 36 बाधित
● जिल्हय़ाला लॉकडाऊनची गरज
● सातारकरांची चिंता वाढली
● कोरोनाचे निदान केले म्हणून डॉक्टरांना मारहाण
प्रतिनिधी/सातारा
जिल्हय़ातील कानाकोपऱयात कोरोना पोहोचला असून 369 गावांमध्ये बाधित रुग्ण कमी जास्त संख्येने समोर येत आहेत. यामध्ये गेल्या आठवडय़ात कोरोनामुक्तीचा वेग मंदावला असून बाधितांचे वाढते आकडे चिंता निर्माण करत असून बाधित व मुक्त संख्यांचा पाठशिवणीचा खेळ थांबवण्यासाठी नागरिक व प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संदेश परिस्थिती देवू लागली आहे. मात्र, मंगळवारी आलेल्या 46 कोरोनामुक्तांनी दिलासा निर्माण केला असला तरी मृतांची झालेली 58 संख्या धोक्याचा इशारा देत आहे. तर सातारा तालुका व शहरातील चिंता वाढत्या बाधितांमुळे वाढली आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात खोऱ्यात कोरोनाचे निधन केले म्हणून डॉक्टरांना मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
*दिलासादायक 46 नागरिकांना डिस्चार्ज*
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याने आता एकूण कोरोनामुक्तांची संख्या 859 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये
*कराड तालुक्यातील 18 कोरोनामुक्त*
कराड तालुक्यात खुबी येथील 19 वर्षीय युवक, उंब्रज येथील 43 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 65 वर्षीय महिला, 12 मुलगी, 8 वर्षाचा बालक व 34 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, 56, 27 व 23 वर्षीय पुरुष, मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, येलगाव येथील 47 वर्षीय पुरुष, तारुख येथील 56 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिला
*पाटण व जावलीतील 16 मुक्त*
पाटण तालुक्यातील सितापवाडी येथील 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, कर्टे येथील 49 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला, 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष व 1 वर्षाचा बालक, पिंपळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष यांनी कोरोनावर मात करत लढा जिंकला आहे. तर खंडाळा तालुक्यातील शहाजी चौक शिरवळ येथील 20 व 42 वर्षीय पुरुष माण तालुक्यात खंडेवाडी (वारुडगड) येथील 33 वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाला आहे.
*सातारा 3 व कोरेगावात 9 मुक्त*
सातारा तालुक्यातील जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, दहिवडी (रोहोट) येथील 28 वर्षीय पुरुष, आर्वे येथील 55 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 28 व 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व 28 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 39 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
*रात्री उशिरा व सकाळी अहवालात 36 बाधित*
काल रात्री उशीरा 25 तर मंगळवारी सकाळी 11 जणांचे अहवाल बाधित आले असून यामध्ये कोरोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 11 व रात्री उशिरात 25 नागरिकांचा असा एकूण 36 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*वाढत्या संख्येने सातारकरांची चिंता वाढली*
बाधितांच्या वाढत्या संख्येने सातारा शहरासह तालुक्याची चिंता वाढली आहे. सातारा तालुक्यातील धनगरवाडी, कोडोली येथील 48 वर्षीय पुरुष, करंडी येथील 59 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, जिहे येथे 1, दौलतनगर येथे 1, अपशिंगे येथे 1, सातारा शहरात कारागृह येथे 3, रविवार पेठ येथे 3, बुधवार पेठ येथे 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील 4 आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.
*आमदारांच्या गावात कोरोनाचा शिरकाव*
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे रहात असलेल्या ल्हासुर्णे, ता. कोरेगाव गावात एक बाधित समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोरेगाव शहरासह तालुक्यात कोरोना बाधित आढळून येवू लागल्याने आता कोरेगावकरांना देखील मोठी काळजी घ्यावी लागणार असून मंगळवारीच्या अहवालात बाधितांमध्ये कोरेगाव येथील सुभाषनगर येथील 75 वर्षीय पुरुष, खडखडवाडी येथे 1, चंचली येथे 1, कोरेगाव शहर येथे 2, आसनगाव येथे 1 ल्हासूर्णे येथे 1 यांचा समावेश आहे.
*कराड 5, खंडाळा 3, फलटण 1,*
कराड तालुक्यात रुग्ण संख्या वाढतच असून कराड तालुक्यात तारुख येथे 3, शामगाव येथे 1, येळगाव येथे 1, तर खंडाळा तालुक्यात लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 50 वर्षीय पुरुष. फलटण येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*खटाव 1, वाई 1 व जावलीत 1*
खटाव, जावली, वाई तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत चालली असून मंगळवारच्या अहवालात त्याचा वेग मंदावला होता. त्यामुळे तिन्ही तालुक्यात बाधितांची संख्या प्रत्येकी एक होती. यामध्ये खटाव तालुक्यात फडतरवाडी येथील 23 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील आसले येथे 1, जावळी तालुक्यात कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 67, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 40, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 31, वाई येथील 23, शिरवळ येथील 72, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 26, मायणी येथील 16, खावली येथील 27 असे एकूण 340 जणांचे घशातील नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
*तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा कान्नरवाडी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष व जिहे ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष आणि फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील कोरोना बाधिताचा तीन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
*मंगळवारपर्यंत जिल्हय़ात*
घेतलेले एकुण नमुने 15593
एकूण बाधित 1372
घरी सोडण्यात आलेले 859
मृत्यु 58
उपचारार्थ रुग्ण 455
*मंगळवारी*
एकूण बाधित 36
एकूण मुक्त 46
बळी 03
Add A Comment