गोडोली / प्रतिनिधी :
गावात सर्व घटकांचा समावेश असणारी ग्राम कमिटी स्थापन करुन शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा. गावाची गरज ओळखून विकास कामेही करुया. युवकांनी राजकारणापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा करून शेतीतून भरघोस उत्पन्न वाढवून स्वतः बरोबर गावाचा लौकिक वाढवावा, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले.
वडूथ (सातारा) गावात गरज ओळखून आमदार निधीतून 1200 स्केअर फुटाचे सभागृह मंजूर करुन, त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच किशोर शिंदे, उपसरपंच संगिता जगताप, विजय साबळे, आबासाहेब साबळे, नारायण साबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
शिंदे यांनी बोलताना निवडणूक संपली की गावात राजकारणाची कटूता कमी झाली पाहिजे. गावातील प्रत्येकासोबत आपले स्नेहाचे संबंध असावेत. लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करु या, मी सदैव तुमच्या सोबत आहे, असा विश्वास दिला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय बोराटे, मदन साबळे, विक्रम साबळे, संतोष कांबळे, छाया गोरे, संतोष साबळे, राजेंद्र साबळे, उमेश साबळे, राजेंद्र निकम, बबन साबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.