प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हय़ात जुलै महिन्यात कोरोनाने उग्र रूप धारण केल्याने अखेर जिल्हाधिकार्यांना लॉकडाऊन घोषित करावा लागला. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रशासन, कोविड योद्ध्दांनी अथक परिश्रम घेतल्याने जून महिन्यात अॅक्टीव्ह कोरोना रूग्णांचे प्रमाण 125 पर्यंत खाली आले होते.
मात्र जुलै महिन्यात निकट सहवासित संसर्ग वाढत अकराशेवर रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत उपचार घेणाऱया ऍक्टीव्ह रूग्णांचा आकडा हजारासमीप पोहोचला आहे. शुक्रवारी 46 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रात्री उशिरा दोन जण पॉझिटिव्ह आले होते. तर सातारा आणि तारळे येथे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या अहवालात 72 बाधित आले आहेत.
लॉकडाऊन सुरू, परिणामांसाठी आणखी 14 दिवस
शुक्रवारपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी त्याचे परिणाम लगेच जाणवणार नाहीत. मुळातच जिल्हय़ात डब्लिंगचा रेट वाढत होता. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. निकट सहवासितांमध्ये संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम दिसण्यासाठी किमान 14 दिवसांचा अवधी जावा लागणार आहे. शुक्रवारपर्यंत ऍक्टीव्ह रूग्णांचे प्रमाण 845 इतके आहे. रोज वाढणारे बाधितांचे आकडे पाहता हे प्रमाण हजाराकडे वाटचाल करत आहे. ॲक्टिव रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील रुग्णालये फुल्ल झाली असून कोरोना केअर सेंटरची जबाबदारी वाढली आहे. त्याचबरोबर प्रशासनास खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण जलद गतीने करावे लागणार आहे.
46 जणांना घरी सोडले
शुक्रवारी जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 रुग्णांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. बाधितांचे आकडे वाढत असताना मुक्त होणारांचे प्रमाणही चांगले राखण्यात यश येत आहे.
डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती : *जावली* तालुक्यातील रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष. *सातारा* तालुक्यातील जिहे येथील 72, 50, 55, 25, 40, 38, 27 वर्षीय पुरुष, 60, 39 वर्षीय महिला, कण्हेर येथील 80 वर्षीय महिला, चोरगेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर येथील 46 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 49 वर्षीय महिला, कोडोली येथील 18 वर्षीय महिला. *कराड* तालुक्यातील तुळसण येथील 3 वर्षीय बालिका, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष. 7 वर्षीय महिला, चरेगाव येथील 36 वर्षीय पुरुष, लटकेवाडी येथील 21 वर्षीय महिला. *पाटण* तालुक्यातील पालेकरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 18 वर्षीय महिला, गोकुळ येथील 18 वर्षीय पुरुष, मारुल हवेली येथील 35 वर्षीय पुरुष, सह्याद्री हॉस्पिटल येथील 32 वर्षीय पुरुष.
*वाई* तालुक्यातील आसले येथील 59 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 29 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 72 वर्षीय महिला, 4 वर्षीय पुरुष, ब्राम्हणशाही येथील 58 वर्षीय पुरुष. *खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, पारगाव खंडाळा येथील 30 वर्षीय पुरुष. *खटाव* तालुक्यातील पुसेगाव येथील येथील महिला. *माण* तालुक्यातील म्हसवड येथील 53 वर्षीय पुरुष, 45, 16 वर्षीय महिला, इंजबाव येथील 28 वर्षीय पुरुष, डोरगेवाडी येथील 22, 55, 13, 19, 40 वर्षीय महिला, मार्डी येथील 42 वर्षीय महिला, गोंदवले बु. येथील 40 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला आदींना डिस्चार्ज देण्यात आला.
गुरूवारी रात्री 70 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह
गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिह्यातील निकट सहवासित 56, प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकुण 70 जणांचे अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
*जावली* तालुक्यातील पुनवडी येथील 54, 31, 43, 18, 10, 40, 62, 30, 50, 56 वर्षीय महिला, 21, 20, 22, 9, 35, 25 वर्षीय पुरुष.
*सातारा* तालुक्यातील सातारा शहरातील बुधवार नाका येथील 43 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 30 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 62 वर्षीय पुरुष, धनगरवाडी 26 वर्षीय महिला, उफळी येथील 55, 1 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय महिला, खावली येथील 29, 80 वर्षीय महिला, खिंडवाडी येथील 55 वर्षीय महिला आणि 55 वर्षीय पुरुष.
*कराड* तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, वराडे येथील 45 वर्षीय महिला, वसंतगड येथील 31 वर्षीय महिला, पोतले येथील 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, कालवडे येथील 29 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, नांदगाव येथील 52 वर्षीय महिला, सैदापूर येथील 76, 40, 20 वर्षीय महिला, पेरले येथील 16, 20 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला.
*खंडाळा* तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील 21 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60, 43 वर्षीय पुरुष.
*खटाव* तालुक्यातील डिस्कळ येथील 58, 37 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला, विखळे येथील 50 वर्षीय पुरुष.
*महाबळेश्वर* तालुक्यातील गोडवली येथील 47, 25, 75, 12, 19, 24, 48 वर्षीय पुरुष. 30, 45, 40, 24 वर्षीय महिला, भिलार येथील 68 वर्षीय पुरुष. *पाटण* तालुक्यातील मीरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, 31 आणि 13 वर्षीय महिला, नारळवाडी येथील 29 वर्षीय महिला, तारळे 54, 45 वर्षीय महिला, कारळे येथील 48 वर्षीय पुरुष, नरळे येथील 50 वर्षीय पुरुष.
*माण* तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील 36 वर्षीय पुरुष. यांचे अहवाल बाधित आले आहेत.
साताऱयातील वृद्धाचा मृत्यू
जिल्हा रूग्णालयात सातारा येथे बुधवार नाका येथील 93 वर्षीय पुरुषाचा 16 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. उपचार करताना त्यांचा घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट काल प्राप्त झाला. श्वसन संस्थेचा तीव्र संसर्ग झाल्याचे लक्षणे असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वी शहरात भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. आता रिक्षा व्यवसाय केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याने शहरातील मृत्यूसंख्या दोन झाली आहे.
तारळेतील व्यापार्याचा मृत्यू
सातारा शहरामधील खाजगी हॉस्पिटलमध्ये तारळे (ता. पाटण) येथील 75 वर्षीय पुरुषाचा 15 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. ते 5 रोजी नातीला आणण्यासाठी पुण्याला गेले होते. तारळेत त्यांची दोन हार्डवेअरची दुकाने असून उपचारासाठी साताऱयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगा आणि सून हेही पॉझिटिव्ह असून तेही उपचार घेत घेत आहेत.
कराड व्यापारी बाधित, रणजित टॉवर सील
गुरूवारी रात्रीच्या अहवालात शहरातील शनिवार पेठेतील रणजित टॉवरमध्ये राहणारा व दत्त चौकात दुकान असणारा 45 वर्षीय व्यापारी पॉझिटिव्ह आल्याने हा रणजित टॉवर सील करण्यात आला आहे. या रूग्णास एरम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत 19 रूग्णांची नेंद झाली आहे. यातील केवळ 4 रूग्ण उपचारात असून 1 मयत तर उर्वरित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रात्रीच्या अहवालात मलकापुरात दोन रूग्ण वाढले असून एकुण रूग्ण संख्या 56 झाली आहे.
जावलीतील एकटय़ा पुनवडीची शंभरकडे वाटचाल
जिल्हय़ात सर्वाधिक रूग्णसंख्या असणाऱया जावली तालुक्यातील पुनवडी या गावात कोरोनाने कहर केला आहे. काल रात्रीच्या अहवालात या गावातील 16 जण बाधित झाल्याने येथील रूग्णसंख्या 91 इतकी झाली आहे. येथील कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
683 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथील 29, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 30, स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 91, फलटण येथील 73, कोरेगांव येथील 28, वाई येथील 45, शिरवळ येथील 118, रायगाव येथील 100, पानमळेवाडी येथे 7, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 17, पाटण येथील 59, दहिवडी 31, खावली येथील 34 असे एकूण 683 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
जिल्हय़ात शुक्रवारी
एकूण बाधित74
एकूण मुक्त 46
एकुण मृत्यू 02
जिल्हय़ात शुक्रवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने 20616
एकूण बाधित 2216
घरी सोडण्यात आलेले 1225
मृत्यू 74
उपचारार्थ ( अॅक्टिव्ह) रुग्ण 917