ठेकेदारामुळे लाभार्थ्यांना मिळेना सुविधा
प्रतिनिधी/सातारा
येथील झोपडपट्टी वासीयांना चांगले पक्के घर देण्यासाठी खासदार उदयनराजे यांच्या प्रयत्नाने एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत 2011 मध्ये घरकुल प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पांअंतर्गत अजून सदर बाजार परिसरातल्या लाभार्थ्यांना घर मिळाले नाही, काहींना घर मिळाले पण सुविधा नाहीत, अशी तऱ्हा असून याचे कामकाज पाहणाऱ्या बीव्हीजी या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक विशाल जाधव यांनी केली आहे.
सातारा शहरात असलेल्या 21 झोपडपट्टीमधील नागरिकांना चांगले घर मिळावे या उदात्त हेतूने एकात्मिक गृह निर्माण प्रकल्पामधून खा. उदयनराजे यांनी 2011 मध्ये मंजुरी आणली. त्या कामाला 2013 मध्ये सुरुवात झाली. प्रकल्पाची किंमत 34 कोटी 70 लाख एवढी होती. 1 हजार 473 घरे 21 कोटी 70 लाखात बांधून पूर्ण करावयाची तर पायाभूत सुविधांसाठी 13 कोटी निधी होता. आठ ठिकाणी हे घरकुल उभारण्याचे काम झाले. लाभार्थी 30 हजार रुपये भरून त्यांना घर मिळणार होते. सगळ्यात जास्त लाभार्थी हे सदरबाजार येथील लक्ष्मी टेकडी येथे आहेत. 510लाभार्थी असून प्रत्येकांनी 30 हजार रुपये घरासाठी दिले आहेत. मात्र, काहींना अजून घरे नाहीत. बांधलेली घरे तशीच असून स्वच्छतेचा अभाव दिसत आहे.
बीव्हीजीला काळ्या यादीत टाकण्यात यावे
लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळाले पाहिजे.त्यांनी कष्ट करून पैसे भरले आहेत.असे असताना घरात सुविधा नाहीत.स्वच्छता नाही, लाईट नाही, पाणी नाही.मेंटन्सचे काम करणारया बीव्हीजी या कंपनीकडून नेटके काम होत नाही.त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विशाल जाधव यांनी केली आहे.
Previous Articleबेंगळूर: ७ सप्टेंबरपासून या मार्गावर मेट्रो धावणार नाही
Next Article कर्नाटक: मंत्रिमंडळाची नवीन आयटी धोरणाला मंजुरी
Related Posts
Add A Comment