प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा मे महिन्यात रेकॉर्डब्रेक वेग वाढला होता. ही वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचाच गैरफायदा घेत संगममाहुलीत अवैध वाळू उपसा सुरु आहे.
सध्या महसुल विभाग कोरोना प्रतिबंधात्मक कामात व्यस्त आहे. त्यातच लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या गैरफायदा घेत सातारा तालुक्यातील संगममाहुलीत कृष्ण धाम मठाच्या परिसरात अवैध वाळूचा उपसा जोरदारपणे सुरु आहे. या वाळु उपशावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. कृष्णा नदीच्या पात्रात होणाऱ्या वाळू उपसामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.
Related Posts
Add A Comment