वाई : वाई शहरात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा रविवारी जमीनदोस्त करण्यात आली. या शिक्षणसंस्थेने 99 वर्षाच्या करारावर एका सामाजिक संस्थेकडून ही जागा घेतली होती. या जागेवर असलेल्या मुलींच्या शाळेची इमारत मोडकळीस आल्याचे पत्र नगरपालिकेने संबंधित सामाजिक संस्थेला दिले होतेे. या सामाजिक संस्थेने शिक्षणसंस्थेला याबाबत माहिती न देता रविवारी सुट्टीच्या दिवशी परस्पर शाळेची इमारत पाडत शाळेचे साहित्य रस्त्यावर टाकले.

आज शाळेच्या मुलींनी पाडलेली शाळा आणिरस्त्यावर पडलेले शाळेचे साहित्य पाहिले, तेव्हा त्यांना रडू कोसळले. शाळा व्यस्थापनाने आमदार मकरंद आबा यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तरीही शाळा पाडल्याने आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने वाई पोलिसात तक्रार नोंदणी करण्याचे काम सुरू होते.
