कोडोलीत 86 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू
प्रतिनिधी/ सातारा
शहरातल्या प्रत्येक पेठेत कोरोनाचा रुग्ण आहे.अगदी साध्या किरकोळ भाजी विक्री करणायापासून फाईव्ह स्टार इमारतीत राहणाया उधोजकास कोरोनाची बाधा झाली आहे.त्यात लोकप्रतिनिधी, डॉक्टर, पोलीस यांचा ही समावेश आहे.मात्र,बाधित झालेल्या रुग्णांना आपल्याला बाधा नेमकी कुठे झाली हे समजत नाही.जेव्हा ताप येतो, कणकणी येते तेव्हाच बाधित झाल्याचे समजते.शहरात बाधितांची संख्या वाढते आहे.कोडोली येथे 86 वयाचे वृद्ध कोरोनामुळे आजारी होते.त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते.त्यांचे निधन झाले.दरम्यान, तालुक्यात रुग्ण आहेत.
सातारा शहर हे जिह्यात कोरोना बाधित म्हणून नंबर दोनचे म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.बाधित रुग्णामध्ये मग कोण डॉक्टर, कोण स्थानिक लोकप्रतिनिधी, कोण उधोजक आढळून येत आहेत.प्रत्येक वॉर्डात रुग्ण आहेत.जरी सर्व खुले केले असले तरी नागरिकांना कोठे बाधा होते ते समजत नाही.एक तर घरात बसून करायचे काय?,पोटाला खायचे काय?,रोजगार उधोग नसल्याने बाहेर पडावेच लागत आहे.किती जरी काळजी घेतली तरी कोरोना हा चिकटत आहे.तो गरीब श्रीमंत असा भेद करत नाही.मात्र उपचार घेण्यासाठी श्रीमंत हा खाजगी हॉस्पिटलमध्ये तर गरीब हा जिल्हा रुग्णालयात मिळेल तेथे उपचार घेतो.सातारा तालुक्यातील आढळून आले बाधितांचा आकडा काही कमी होत नाही.आढळून आलेल्या 19 रुग्णामध्ये मंगळवार पेठ, सातारा येथील 50 वर्षीय महिला60 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 23 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 30 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, चिंचणेर निंब येथील 35 वर्षीय महिला, परखंदवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, कोपर्डे येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, विकासनगर येथील 30 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 15 वर्षाची युवती, सदरबझार, सातारा येथील 31 वर्षीय महिला, माचीपेठ, सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, देगाव फाटा, एमआयडीसी, सातारा येथील 59 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले.तर कोडोली येथील 86 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला.ते पाच दिवसापासून आजारी होते.तर खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये अजिंक्य कॉलनी, सोनगाव निंब क्षेत्र माहुली येथील 58 वर्षीय पुरुष, संगमनगर, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.