जिल्हा परिषदेत अधिकारी, पदाधिकारी यांना दिले निवेदन
सातारा / प्रतिनिधी
सन 2018 मधील रँडम राऊंड व 2019 मधील विस्थापित शिक्षकांना पदस्थापना बदलून मिळणेसाठी बदलीची संधी उपलब्ध करून देण्याची मागणीचे शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना निवेदन दिले.
जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व दुग्धविकास सभापती मंगेश धुमाळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रभावती कोळेकर यांची भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन दिले. यावेळी या विषयाची सविस्तर चर्चाही करण्यात आली.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सर्व तालुक्यात सम प्रमाणात समानीकरण खुले करून त्या ठिकाणी विस्थापित शिक्षकांना संधी देण्यात यावी, एकदा अथवा दोनदा बदलीचा लाभ घेतलेले शिक्षकांना पुन्हा संधी देऊ नये, 2018 मधील व 2019 मधील शिक्षकांनी एकदा अथवा दोनदा बदलीचा लाभ घेतलेल्याना विस्थापित समजण्यात येऊ नये, जेणे करून एकदा ही लाभ न मिळालेल्या शिक्षकांना बदलीची संधी मिळेल याचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे, शिवाजी शिंदे, किरण यादव, कराड पाटण सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश नांगरे, उदयकुमार नाळे, लालासाहेब देसाई, संदे, घाडगे आदी उपस्थित होते.