सातारा/प्रतिनिधी
एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १५० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
४ जणांचे नमुने तपाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 4 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.